एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? (affiliate marketing in marathi)
तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे आणि आपल्या जीवनावर त्याचा फार प्रभाव पण पडतोय. इंटरनेट आणि मोबाइलचा वाढता वापरामुळे आज आपलयाला अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक आहे ऑनलाईन पैसे कमावण्याचे नवे मार्ग. तुम्ही घरून फावल्या वेळात काम करून, दिवसातून काही वेळ अश्या काही ऑनलाइन गोष्टींसाठी देऊन सुद्धा काही प्रमाणात उत्पन्न मिळवू शकता. अर्थात यातून मिळणारा मोबदला हा तुमच्या मेहनतीवर अवलंबून असेल.
अर्थांजनाच्या परिभाषेत याला पॅसिव्ह इन्कम (Passive Income) म्हणून ओळखलं जात, ज्याचा अर्थ कमी काम करून तुम्ही पैसा मिळवण्याची तरतूद करून ठेवता आणि या माध्यमातून तुमची कमाई होत रहाते.
पारंपरिक गुंतवणुकीचा विचार केला असता तुम्ही जास्त व्याज मिळवण्यासाठी केलेली गुंतवणूक सुद्धा पॅसिव्ह इन्कमच्या व्याख्येत बसू शकते. तुम्ही गुंतवलेला पैसा या ठराविक व्याजदराने वाढत असतो ज्यासाठी तुम्हाला वेगळे असे दुसरे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing in Marathi) हा ऑनलाइन पैसे कमावण्याचा असाच एक मार्ग आहे. एफिलिएट मार्केटिंग आजकाल इतका परवलीचा शब्द झालाय आणि आपण बऱ्याच वेळेला त्याबद्दल ऐकत असतो पण तरीसुद्धा तुमच्या मनात याबद्दल काही शंका असतील तर त्या आपण या लेखातून दुर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तुम्हांला एफिलिएट मार्केटिंग सुरु करायची असेल तर तुम्हाला इंटरनेटबद्दल जुजबी ज्ञान असलेलं चांगलं त्यापेक्षा तुम्हाला कुठलीही प्रकारची मार्केटिंग स्किल्स, वेब डिझायनिंग किंवा संगणक असणं गरजेचं नाही – यापैकी कुठली कौशल्य तुम्हला येत असतील तर तुम्ही अधिक प्रभावीपणे जहे काम करू शकता पण त्याशिवायसुद्धा तुम्ही सुरवात करू शकता.