आपलं आर्थिक आरोग्य पाळण्यासाठी हे करा

बे दुणे चार - मराठी ब्लॉग

आरोग्य विमा स्वतः आणि परिवारासाठी पुरेसा आरोग्य विमा घेऊन ठेवा.   अकस्मात उद्भवलेला मोठा खर्च फक्त तुमची सेविंग खात नाही तर तुम्हाला आर्थिक जीवनात काही वेर्ह्स मग पण नेऊन ठेवतो. 

टर्म इन्शुरन्स हि गुंतवणुकीचा साधन नाही तर शुद्ध विमा आहे.   कमी पैश्यात जास्त विमा मिळवण्याचा उत्तम मार्ग. यार परतावा विलग नाही म्हणून टाळू नका.  

टर्म इन्शुरन्स परताव्यासाठी नाही

इतकाच खर्च करा जितका तुम्ही एकरकमी भरू शकता, अन्यथा १८-३२% व्याज भरणं काही व्यावहारिक आणि परवडण्यासारखं नाही.  स्वतःला आधुनिक सावकारी पासून दूर ठेवा.

क्रेडिट कार्ड जपून वापरा

स्वतः अंबानींन घरच्या लग्नात आपल्या कमाईच्या नगण्य रक्कम खर्च केली तिथं आपल्यासारख्या सामान्यांनी फक्त एका लग्नामध्ये आपल्या जीवनभराची कमाई खर्च करणं किती योग्य आहे?  

आर्थिक दिखावा टाळा

कुठल्याही प्रकारचा मोफत सल्ला जर तुम्हांला तुमची सध्याची आर्थिक स्थिती, कमाई, आताच्या आणि भविष्यातील गरज न विचारता दिला गेला असेल तर सपशेल दुर्लक्ष करा. तुमची आर्थिक गरज जास्त महत्वाची आहे त्यांचं कमिशन नाही.

मोफत सल्ले टाळा 

आपण अर्थसाक्षर नसाल तर ज्याचं काम त्यानं करावा असा साधा नियम मानुन  - आर्थिक विषयातल्या तज्ञाची मदत घ्या.

आर्थिक सल्लागाराची मदत घ्या

अधिक माहितीसाठी  बे दुणे चार - मराठी ब्लॉग ला भेट द्या !!