
‘डार्क वेब’ काय आहे? What is Dark Web?
डार्कवेब म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर काम करणाऱ्यांचं नंदनवन – खरं सांगायचं म्हणजे डार्क वेब हि संकल्पना धोकेदायक आहे. जर तुम्हाला इंटरनेट किंवा डार्कवेब बद्दल फक्त जुजबी ज्ञान असेल तर तुम्ही डार्कवेब ह्या प्रकारापासून लांबच राहिलेलं बरं.
“टॉर” ब्राऊजर | TOR Browser
डार्क वेब वापर करण्यासाठी साधी इंटरनेट ब्राउजर्स ह्यांचा वापर केला जात नाही, त्यासाठी विशेष असं “टॉर” हे ब्राऊजर वापरावं लागतं.
डार्कवेबवर असणाऱ्या वेबसाईट्स ह्या कुठल्या डोमेनवर होस्ट न करता ती वेबसाइट बनवणाऱ्या कुठल्याही संगणकावर असतात त्यामुळं त्यांचा माग घेणं तसं फार कठीण किंबहुना अशक्य प्रकारातील गोष्ट असते. हि साईट्स बनवणारी लोकं वाईट व्यवहारांमध्ये, हॅकिंग मध्ये तरबेज असल्याने तशीही काही काळानंतर आपोआप ते आयपी किंवा सर्वर फिरवत असतात त्यामुळं त्याच्या पर्यन्त पोचता पोचता नाकीनऊ येतात.
डार्कवेबचा वापर ह्या प्रामुख्याने सर्व प्रकारची बेकायदा काम करण्यासाठी केला जातो. तुम्ही गम्मत म्हणून ते बघायला जल आणि क्षणांत तुमच्या संगणकाची चावी आणि डेटा त्याचे हवाली करून बसाल.
तुम्हला जर डार्कवेब बद्दल काहीही किंवा जुजबी माहिती असेल तर तुम्ही ती विसरून त्यापासून अंतर राखणेच सुरक्षित राहील, तुम्ही हॅकिंग बद्दल जर जाणत असाल तर तुम्ही आपल्या ज्ञानाला वंदून तो धोका पत्करू शकता.