एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? (affiliate marketing in marathi)

affiliate-marketing-in-marathi

एफिलिएट मार्केटिंग आहे काय? What is Affiliate Marketing in Marathi

एफिलिएट मार्केटिंग हा एक कमिशन आधारीत मार्केटिंगचा प्रकार आहे. तुम्ही एफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम असणाऱ्या कुठल्या उत्पादन किंवा सेवा कंपनीशी स्वतःला जोडून घेता आणि त्यांची उत्पादनं ऑनलाईन पद्धतीने जाहिरात करता. तुमच्या केलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून जर तुम्ही त्यांना उत्पादन विक्रीची लीड देऊ शकलात तर ती कंपनी तुम्हाला ठरल्याप्रमाणं कमिशन देते.

सध्याच युग हे डिजिटल मार्केटिंगच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मोबाइलवर इंटरनेटचा वापर इतका वाढलाय कि आपण प्रत्येक गोष्ट करण्याआधी एकदा मोबाइलवर नक्की पाहून त्याविषयी खात्री करून घेतो. प्रत्येकाचा मोबाइल वापर आणि त्याअनुषंगाने एक ग्राहक म्हणून कंपन्यांना त्यांची उत्पादन आपल्यापर्यंत पोचवणं अगदीच सोपं झालेलं आहे – आणि आपल्या याच सवयींचा वापर करून घेण्यासाठी आणि आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी एफिलिएट मार्केटिंगचा वापर केला जातो.

एफिलिएट मार्केटिंग कसं काम करते?

कुठली कंपनी आपल्या उत्पादनाच्या अतिरिक्त खतासाठी असे प्रोग्रॅम तयार करते आणि ब्लॉगर, वेबसाईट्स असणाऱ्या लोकांना, फेसबुक ग्रुप्स असणाऱ्या लोकांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करते. हि लोक मग आपल्या ऑनलाईन चॅनेलमार्फत त्या उत्पादनांची उपयुक्तता आणि उत्पादकता आपल्या कॉन्टेन्टच्या माध्यमातून लोकांना समजावून देण्याचा प्रयत करतात आणि त्यामधून जर खरेदी होत असेल तर यांना काही प्रमाणात कमीशन दिल जाते.

हा सर्व व्यवहार फक्त ती कंपनी आणि एफिलिएट मार्केटिंगशी संलग्न असणाऱ्या मधेच होतो – यासाठी ती गोष्ट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कुठलाच जास्तीचा आर्थिक भार सोसावा लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee