Google Chrome वर लॉगिन पासवर्ड जतन करू नका | don’t save a password in the browser

Do not save the password in browser programs

Google Chrome वर लॉगिन पासवर्ड जतन करू नका | DON’T SAVE A PASSWORD IN THE BROWSER

तुम्ही कुठलाही ब्राऊजर सॉफ्टवेअर किंवा ऍप्स वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

इंटरनेट ब्राऊजर प्रोग्रॅम बनवणाऱ्या कंपन्या प्रचंड मेहनत करून त्यांची प्रोग्रॅम सुरक्षित (Internet browsers security threats) ठेवण्याचा प्रयन्त करतात पण तरीही नवनवीन ट्रोजन, मालवेअर प्रोग्रॅम गतीने डेव्हलप होत आहेत त्यानं आपला डेटा चोरी होण्याची भीती सतत राहते.

कोविड-19 महामारीच्या काळात जवळपास प्रत्येकाचाच स्क्रीन टाइम वाढलेला आहे, आपण मोबईल स्टोर वरून कित्येक ऍप्स, ब्राउजर्स आणि गेम्स असुरक्षितपणे डाउनलोड करतो आणि वापरतो – आणि यामुळं आपला खाजगी डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो.

Internet browsers security threats

आणि कारणामुळे गेला २ वर्षांत सायबर गुन्हेगार लोकांचा डेटा, माहिती, खाती, क्रेडेन्शियल्स आणि इतर वैयक्तिक माहिती मिळवत असल्याच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. आता नवीन प्रकारचे सायबर गुन्हे वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

सर्वात चिंतेची बाब अशी आहे की एकदा कुठल्या व्हायरसने किंवा ट्रोजन ऍप्सने तुमच्या उपकरणांना संक्रमित केले की, तो प्रोग्रॅम तुमची क्रेडिट कार्ड माहितीपासून ते ऑटोकंप्लीट लॉगिन क्रेडेन्शियल्सपर्यंत सर्वकाही चोरण्यास सक्षम आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे, तुमचा ब्राउझर देखील लॉगिन पासवर्ड जातं करून तुमची माहिती वाचू शकतो – आणि ते हि तुमच्या नकळत.

जर तुम्ही तुमचे पासवर्डस तुमच्या Google Chrome आणि Microsoft Edge ब्राऊजर प्रोग्रॅम मध्ये जतन करत असाल तर तुमची थोडं चिंतित होणे आणि लगेच कारवाई करणे आवश्यक आहे.

आपली बरीच खाती असतात आणि सर्वांचे पासवर्ड लक्षात ठेवणं एका मर्यादेनंतर लक्षात ठेवणे अवघड आहे. हे पासवर्ड लक्षात ठेवण्याऐवजी आपण सोपा उपाय निवडतो तो म्हणजे आपले पासवर्ड Google Chrome आणि Microsoft Edge ब्राउझरच्या पासवर्ड सेव्ह करण्याची सोय वापरतो. तथापि, तुमच्या ब्राऊजर चा ऍक्सेस जर हे सायबर चोर मिळवू शकत असतील तर तर ते तुमचा डेटा चोरू शकतात.

2021 मध्ये, 441,000 चोरी झालेल्या खाते क्रेडेंशियलमध्ये तडजोड केल्याचा आरोप आहे. Haveibeenpwned.com या वेबसाइटने खरोखर किती खाती घेण्यात आली आहेत याचा मागोवा ठेवत असल्याचे सांगितले आहे. ही वेबसाइट वापरकर्त्यांच्या ईमेल पत्त्यांची तुलना मागील डेटा उल्लंघनाशी करते आणि काही जुळत असल्यास त्यांना सूचित करते.

DON'T SAVE A PASSWORD IN THE BROWSER

तुमचा डेटा चोरीला गेला आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता?

Haveibeenpwned.com हे तुमच्या डेटाशी तडजोड झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सेवा प्रदान करू शकते. डेटा चोरीच्या सतत वाढत असलेल्या यादीसह हि वेबसाइट दररोज अद्ययावत केली जाते. RedLine ने तुमचा ईमेल अॅड्रेस वापरला आहे असे वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या सिस्टमवरील सर्व खात्यांचे पासवर्ड बदलणे आवश्यक आहे, तसेच कार्य VPN आणि ईमेल खात्यांसह, तसेच तुम्ही त्या डिव्हाइसवर कदाचित वापरलेले इतर प्रत्येक वैयक्तिक खाते. हॅकरच्या सर्व खात्यांसाठी फक्त पासवर्ड रीसेट करणे पुरेसे नाही.

रेडलाइन मालवेअर(Redline Malware) काय आहे आणि ते कसे कार्य करेल? | Redline Malware Alert

रेडलाइन हे डेटा चोरी करणाऱ्या सॉफ्टवेअरचे नाव आहे. सुरुवातीला डार्क वेबवर मार्च 2020 मध्ये सापडला होता, ज्याप्रमाणे कोरोनाव्हायरस लॉकडाउन लागू केले जात होते. व्हायरस विविध वेबसाइट्सवरून वापरकर्त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल आणि पासवर्ड सहजपणे चोरू शकतो, तसेच कॉर्पोरेट VPN मध्ये प्रवेश मिळवू शकतो.

Redline Malware

तुम्ही तुमचे खाते क्रेडेंशियल कसे सुरक्षित ठेवता? | How to safe-guard your passwords?

संसर्गाच्या व्यापक चिंतेमुळे, आयटी व्यावसायिकांनी यापूर्वी संकेतशब्द आणि खात्याची माहिती वेब ब्राउझरमध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तुमचे बरेच पासवर्डस असतील आणि ते तुम्हांला लक्षात ठेवणं धाड होत असेल तर तुम्ही “पासवर्ड मॅनेजर्स” प्रोग्रॅम वापरण्याचा पर्याय निवडू शकता. तुमच्या कडे जर “अँटीव्हायरस प्रोग्रॅम” असेल तर आजकाल सर्वच “अँटीव्हायरस प्रोग्रॅम” त्यांचं पासवर्ड मॅनेजर्स टूल विनामुल्य देतात.

बाऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याएवजी हि पासवर्ड मॅनेजर्स बऱ्यापैकी सुरक्षा असतात आणि त्यांची’सुरक्षा भेदणं एक महाकठीण काम आहे – यामुळं तुमचा देता सुरक्षित राहायला मदत होईल आणि तुम्ही निश्चिन्त राहू शकाल.

पासवर्ड मॅनेजर्स टूल्स हे फ्री आणि पेड दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. फ्री उपलब्ध टूल्स तुम्हाला साधारणपणे ५० – ६० पासवर्डस जातं करण्याची सोय देतात, पण पेड सुब्स्क्रिप्शन मध्ये अशी कुठली मर्यादा नाही आणि त्यासोबतच आपल्याला इतर अनेक फीचर्स सुद्धा मिळतात.

पासवर्ड मॅनेजर्स फ्री टूल्स | Best Password Managers 2022 :

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee