इंटरनेट कसे चालते | How does Internet Works

मराठीत आपण इंटरनेट ला अंतरजाल म्हणतो आणि ते कुठल्याही मायाजालापेक्षा कमी नाही. इंग्रजीमध्ये लिहितांना ते Internet किंवा internet असं लिहिलं जातं, काय गोंधळात? पण ह्या दोनी वेगळ्या गोष्टी आहेत.

इंटरनेट कसे चालते? How does Internet Works?

Internet – जगभरात आंतर-कनेक्ट केलेल्या नेटवर्कच नेटवर्क / संपूर्ण इंटरनेट (म्हणजे ग्रहवरील नेटवर्कचा सर्वात मोठा संग्रह)

internet – नेटवर्क्स जे समूह म्हणून जोडलेले आहेत.

Internet vs internet

म्हणजे व्याख्येनुसार बघितलं तर Internet हे internet आहे पण internet हे Internet नाही.

ARPANET थोडक्यात इतिहास बघूया –

१. इंटरनेट सारख्या काहीतरी असावं अशी सर्वप्रथम कल्पना हि १९०० साली निकोला टेस्ला याच्या डोक्यात आली जेणेकरून वैज्ञानिक एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील, माहितीची सहज उपलब्धता राहिलं आणि असंच काहीतरी, पण यात फार काही होऊ शकलं नाहीं

२. प्रथम प्रारूप १९६० साली अमेरिकन सैन्य विभागाकडून आर्पानेट (ARPANET) च्या नावानं सादर झालं

३. १९७० दरम्यान रॉबर्ट कान आणि विन्टन सेर्फ यांनी टीसीपी / आयपी (Transmission Control Protocol and Internet Protocol, or TCP/IP) विकसित केल्यावर खरी या प्रकल्पाला गती मिळाली

४. आर्पानेट(ARPANET) ने 1 जानेवारी 1983 रोजी टीसीपी / आयपी ( TCP/IP Protocol ) चा अवलंब केला आणि त्यातून संशोधकांनी “नेटवर्कचे नेटवर्क” एकत्र केले जे आधुनिक इंटरनेट बनले.

शीतयुद्धाच्या काळात आर्पानेट(ARPANET) प्रकल्पाचा मुख्य उद्देश हो होता कि जर एखादं एक शहर उडवलं गेलं तरी दळणवळण कुठल्याही प्रकारे नष्ट होता काम नये , जवळच्या उपलब्ध असलेल्या इतर मार्गांनी संपर्कव्यवस्था अबाधित राहावी. त्याच वेळी अमेरिकेने जमीन ते किनारपट्टी जोडणारी शक्य तितकी भौतिक राष्ट्रीय महामार्ग तयार केली. म्हणून रस्ते बांधणी आणि इंटरनेटचे प्रथम प्रारूप यां दोन्ही यंत्रणाचा उद्देश सारखाच होता.

तर हे इंटरनेट जोडत कसं ?

हि नेटवर्क खाजगी (म्हणजे सुरक्षित आणि ठराविक जागेत वापरण्याजोगी जसं तुमचं ऑफिस नेटवर्क कंपनीच्या खाजगी कामासाठी ) इंट्रानेट आणि जे सार्वजनिरीत्या म्हणजे कुणालाही वापरता येईल असं इंटरनेट.

आता हे एक नेटवर्क आहे आणि म्हणून त्याला कनेक्ट असलेलं प्रत्येक गोष्टीला एक स्वतन्त्र पत्ता असणं आवश्यक आहे त्याला आपण IP ADDRESS म्हणतो.

जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरण्याचं काम करता म्हणे तुम्ही स्वतःला असल्याचं कुठल्यातरी मशिनशी जोडून घेता आणि त्यावरची माहिती ऍक्सेस करता. हे मशीन तुम्हाला वेबसाइट, वेब सर्विस इत्यादी गोष्टी पुरवू शकते, ज्यांचा युनिक ऍड्रेस आपण डोमेन नाव म्हणून ओळखतो जसं – गूगल आपल्या सर्विसेस या www.google.com या डोमेन ने पुरवते.

वेबसाइट कशी ऍक्सेस होते ?

तुमची मशीन हि कुठलीतरी वेबसाइट वापरण्याची आज्ञा देते तेव्हा –

१. तुमचा वेब ब्राऊजर हि आज्ञा तुमच्या मोडेम कडून, सर्वरला पाठवते

२. हा सर्वर तुमची वेबसाईट चा पत्ता बरोबर आहे कि नाही बघतो आणि तस असेल तर

३. हि विनंती राउटर कडून त्या विशिष्ट पत्त्यावर पाठवली जाते

४. तुमची विनंती त्या पत्यावर पहोचल्यावर तीच पृथक्करण करून तुम्हाला योग्य ती माहिती उपलब्ध करून दिली जाते आणि तुम्ही कन्टेन्ट तुमच्या वेब ब्राऊजर माडे बघू शकतात

हा जो भाग आपण बोलतोय या प्रकाराने तुम्ही उपलब्ध असलेल्या इंटरनेट चा ४-५% भागच फक्त वापरू शकतात, कारण इंटरनेटचे प्रकार.

इंटरनेटचे प्रकार | Types of Internet

इंटरनेट साधारण ३ भागात विभागता येत.

सरफेस वेब / Workd Wide Web (WWW) / Surface Web त्या वेबसाईट आहेत ज्या तुम्ही www ने तुमच्या वेब ब्राऊजर हुन ऍक्सेस करू शकतात, यांचा टक्का इंटरनेटच्या आकारमान नुसार फक्त ४-५% आहे. e.g. www.quora.com

डीपवेब/Deep Web – साधारण ८५-९०% टक्का हा डीपवेब आहे हे आपण वेब ब्राऊजर वापरून ऍक्सेस करू शकत नाही. डीप वेब हा साधारणतः ऑनलाईन ऍक्सेस करू शकणारे अँप्लिकेशन या संबंधित आहे जे कुठ्ल्यातरी आस्थापनांनी आपापल्या उदयोगांच्या उपयोगासाठी बनवलेली आहेत जसेकी बँक, ई-मेल अकाउंट्स, शॉपिंग वेबसाइट्स, पेड सुब्स्क्रिप्शन असलेल्या सेवा, या तुम्ही मर्यादित प्रमाणात वापरू शकता पण पूर्ण अधिकार हवा असल्यास तुम्ही त्याचा भाग असणं गरजेचं आहे उदा. बँकेच्या वेबसाइट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता पण तुमचं अकाउंट फक्त तुम्हालाच वापरता येईल.

डार्कवेब/ Dark Web – जसं नाव तसं काम. असुरक्षित. धोकादायक आणि बहुतांशी बेकायदेशीर. तुम्हाला यासंदर्भात सुरक्षेचं ज्ञान नसेल तर याचा विचार सुद्धा करू नका. हे वापरण्यासाठी विशिष्ट्य सॉफ्टवेअर वापरावी लागतात. याला कनेक्ट असलेली प्रत्येक वेबसाईट/संकेतस्थळ हे त्या त्या मशीन वर उपलब्ध असतं, त्यामुळं हि बंद किंवा मॉनिटर करणं केवळ अशक्य आहें. यांचा वापर हा ज्ञात असलेल्या प्रत्येक बेकायदेशीर काम साठी केला जातो.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee