The Art Of Saying No
- लेखक: डेमन झेहारियाज (Damon Zahariades)
- अनुवाद – सोनाली नवांगुळ
- प्रकाशक: साकेत प्रकाशन
- एकूण पाने : 144
- किंमत : Rs. 157
तुमच्या सोबत असं झालाय का? एका शनिवारच्या एखाद्या प्रसन्न सकाळी आपण छान चहाचा आस्वाद घेतांना आज काय करावं ह्याच विचार करीत असतो आणि एकदम बॉसचा फोन येतो. ऑफिसचं कुठलं अचानक उभं राहिलेलं (जे नाही झालं तर जवळ जवळ जगबुडी येणार इतक्या) महत्वाचं काम करायला जे आजच करायला हवं म्हणून तुम्हाला सांगण्यात येतं आणि आपल्यापैकी अनेक लोकं आता काम इतक्या महत्वाचं आहे म्हटल्यावर मग नाही कसं म्हणावं असं म्हणुन होकार देतात आणि लागतात कामाला..
किंवा, दुसरा प्रसंग म्हणजे – कुठली गृहिणी आपली घरातली सगळी काम आवरून सवरून आता जरा सगळ्यांसोबत बसावं म्हणुन समोर आली की अचानक सगळ्यांकडुन चहावगैरेचीं फर्माईश होते अन गृहिणीची रवानगी पुनश्च आपल्या किचन मध्ये….
पण अश्या उदाहरणांमध्ये आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी अडकलेला आहे. असं काहींसोबत कधीतरी होत आणि काहींसोबत मात्र सतत होतं .
यासाठी तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये असायलाच हवं असं नाही. तुम्ही बस मध्ये असाल, बिल करण्याच्या रांगेत असाल किंवा अगदीच काही करत नसाल – आपल्या हातात असलेलं काम सोडून इतरांनी केलेली कसली विनंतीला आपण हो म्हणतो आणि अनपेक्षित असलेलं काहीतरी स्वतःवर ओढून घेतो – ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला नाही म्हणता येत नाही किंवा तुम्हांला गृहीत धरलं जातं.
‘नाही’ तसं पाहिलं तर अगदीच लहानसा शब्द आहे. तरीही आपण बहुतेकांना हे मात्र मान्य करावेच लागेल की आपण तो उच्चारायला घाबरतो. काही प्रसंगांत जेव्हा आपल्याला नकार देणं जमलेलं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला ते सहज वाटत नाही, आपण काहीतरी सबबी सांगतो आणि विनंतीकर्त्याची माफी मागून टाकतो. खरंच नाही पाहायला इतकं अवघड का आहे?
‘नाही’ इतक्या लहान शब्दामध्ये इतकं वजन कुठून येतं? आपण तो उच्चारायला इतकं का चाचरतो?
‘नाही’ तसं पाहिलं तर अगदीच लहानसा शब्द आहे. तरीही आपण बहुतेकांना हे मात्र मान्य करावेच लागेल की आपण तो उच्चारायला घाबरतो. काही प्रसंगांत जेव्हा आपल्याला नकार देणं जमलेलं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला ते सहज वाटत नाही, आपण काहीतरी सबबी सांगतो आणि विनंतीकर्त्याची माफी मागून टाकतो.
‘नाही’ इतक्या लहान शब्दामध्ये इतकं वजन कुठून येतं? आपण तो उच्चारायला इतकं का चाचरतो?
खरंच नाही पाहायला इतकं अवघड का आहे? याचं उत्तर आहे “नाही”.
नाही म्हणायला अवघड असं काही नाहीये पण आपण इतरांची जे तुमच्या जवळचे आहेत, मित्र आहेत किंवा अगदी अनोळखी असलेल्यानासुद्धा काळजी दाखवतो किंवा स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो म्हणुन नाही म्हणायला आपल्याला जड जातं.
आपल्यापैकी अनेकांना ‘नाही’ म्हणणं हे उद्धटपणाचं आणि अहंकाराचं लक्षण आहे, हाच विश्वास बाळगून असतात. मग त्यांच्या जगण्याच्या मूल्यांचा तो एक महत्त्वाचा भाग बनतो. त्यातून आपलं बरंचस बालपण आणि अर्धअधिक प्रौढत्व आपल्याला प्रतिष्ठित आणि आदरास पात्र वाटतं, अशा प्रतिमेचं प्रतिबिंब बनण्याचा प्रयत्न करण्यात खर्ची पडतं.
याचा परिणाम?
आपल्याभोवती असणार्या सगळ्यांना आपण ‘हो…हो’ म्हणत सुटतो. अगदी आपण टोकाचे वैतागलेले असू, संतापलेले असू किंवा मत्सराने ग्रासलेले असू तरी आपण ‘हो’ म्हणतो.
नाही म्हणण्याचं इतकं भय वाटण्यामागची अनारोग्यकारक कारणं लवकरच आपण शिकणार आहोत. काही स्पष्ट दिसणारी असतात, काही तितकी लक्षात येत नाहीत, त्यांना ओळखायला आहोत. या पहिल्या पायरीवर चढल्यामुळे नाही म्हणणं म्हणजे कुजकेपणा, बथ्थडपणा किंवा स्वार्थीपणा या चुकीच्या समजातून आपण स्वत:ला सोडवणार आहोत.
नकाराचे महत्व (Importance of Saying NO)
समजा कुणी तुमच्याकडे मदत मागितली, तर तुम्ही तत्काळ हातातलं काम बाजूला सारून, ‘हो तर!’ म्हणता?
आता इथंच मोठा वादाचा विषय आहे : सतत इतरांच्या प्राधान्यक्रमाला स्वत:च्या आधी स्थान देण्यातून तुम्हाला दु:खी, चिंतामग्न आणि थकल्यासारखं वाटतं का?
असं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
लोकांना नाही म्हणू शकणं हे एक विकसित करण्याजोगं अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. त्यामुळं तुमच्या स्वत:च्या आवडीनिवडी मग त्या खासगी असोत की व्यावसायिक, त्यांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मोकळे होता. त्यातून अखेर तुमच्या उत्पादकतेत वाढ होणं, नातेसंबंध हे होतंच; पण आजवर तुम्हाला अनोळखी असणार्या शांतवणार्या आत्मविश्वासाने तुम्ही भरून जाता.
नाही म्हणू शकण्याची क्षमता तुम्हाला मुक्त करते. मात्र हे कौशल्य वाढवत नेण्याची गोष्ट जरा अवघडच. आपल्यापैकी बर्याच जणांसाठी वर्षानुवर्षे जे केलं तो प्रवास अगदी उलट दिशेनं करण्याची ही गोष्ट. नाही म्हणणं म्हणजे जन्मभर आपल्या पालक, शिक्षक, बॉस, आणि कुटुंबीय यांनी जो उपदेश आपल्यात रुजवला तो एका अर्थी निष्फळ ठरवण्याचा प्रकार.
पण हे प्रयत्न फार मोलाचे. एकदा तुमच्यात विनयपूर्ण आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणण्याची क्षमता भिनली आणि नेहमी तुम्ही तिचा वापर करू लागलात की आसपासचे लोक तुमच्याकडे कसे बघतात, त्यातला बदल तुमच्या लक्षात येईल. ते तुमच्याकडे अधिक आदराने पाहतील, वेळेला किंमत देतील आणि तुम्हाला ते अनुयायी नव्हे तर नेता म्हणून भेटायला येतील.