Quora काय आहे?
Quora Partner Program | Question or Answer म्हणजेच “Quora” – एक प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात तयार केलेला, जगभरात अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणारा, ऑनलाइन ज्ञान सामायिकरण (Knowledge Sharing) प्लॅटफॉर्म आहे. या व्यासपीठाची निर्मिती 25 जून 2009 रोजी ऍडम डी’एंजेलो आणि चार्ली चीव्हर यांनी कॅलिफोर्निया येथे केली.
सार्वजनिकपणे कोरा सर्वांसाठी रिलीज केल्यानंतर वापरकर्त्यांनी जोडलेल्या दर्जेदार प्रश्न आणि उत्तरांमुळे Quora बद्दल त्वरीत बरेच आकर्षण वाढले आणि 1 वर्षाच्या अल्प कालावधीत एकूण मूल्य $86 दशलक्ष पर्यंत पोहोचले.
Quora जगात अनेक भाषांमध्ये उपलब्ध असून भारतात सुद्धा मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषेंत वापरता येऊ शकते.
Quora Partner Program (QPP)
Quora स्वतःच्या प्लॅटफॉर्मसाठी कोणतीही सामग्री (Content development) विकसित करत नाही, परंतु ते संपूर्णपणे वाचक आणि योगदानकर्त्यांवर अवलंबून आहेत.
जसं आपण आपल्याला पडलेला कुठलाही प्रश्न गुगल वर शोधतो त्याचप्रमाणें वाचक त्यांना हवी असलेली माहिती प्रश्नाच्या स्वरूपात कोराच्या व्यासपीठावर विचारतात. ज्या कुणाला त्या प्रश्नांबद्दल माहिती आहे असा कुणीही व्यक्ती त्यांचं उत्तर देऊ शकतो. याच सर्व प्रक्रियेमधून कोराच्या व्यासपीठावर सारी माहिती जमवलेली आहे.
जोपर्यंत जास्तीतजास्त लोकं चांगले प्रश्न विचारात राहतील आणि वाचक, लेखक त्यांची यथायोग्य उत्तर देत राहतील, ज्यामुळं Quora अधिकाधिक लोकांचा ओढ स्वतःकडे वळवू शकेल – तोपर्यत स्वतःच कुठली वाचनयोग्य साहित्य(readable useful contents) किंवा सामग्री (content development) निर्माता न करता सुद्धा माहितीने परिपूर्ण आणि समृद्ध होत राहील.
आता लोकांनी अधिकाधिक चांगले प्रश्न विचारायला लावणं हे काही Quora च्या हातात नाही पण त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ने एक प्रग्राम निर्मिती केली ती हीच- Quora Partner Program.
यात सहभागी होण्यासाठी सध्यातरी Quora स्वतःच वापरकर्त्यांची निवड करते. यान निवडलेल्या वापरकर्त्यांना अर्थपूर्ण आणि शक्यतो आधी न विचारलेलं गेलेले युनिक प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही अगदी थोडे पैसे देऊ करते. तुम्ही विचारलेला प्रश्न जितका चांगला, त्याला जितके जास्त लोक भेटी देतील, त्यातून काही अफिलिशन लिंक कॉन्व्हर्जन होऊ शकत असेल – अश्या प्रश्नांना साहजिकच थोडे जास्त पैसे मिळतात.
QPP हा प्रोग्रॅम तयार केल्या पासून अनेकांची अशी धारणा झाली कि यामार्फत भक्कम कमाई वगैरे करता येऊ शकते – आणि त्याच संदर्भात हा लेख.
Quora Partner Program माध्यमातून पैसे कमावता येतात का?
क्वोरा वर उत्तरं लिहून पैसे कमावता येत नाहीं, हो प्रश्न विचारून क्वोरा तुम्हाला त्यांच्या जाहिरातीतून कमावलेल्या उत्पन्नातून फारच निम्न वाटा देऊ शकते – हाच पार्टनर प्रोग्रॅम आहे.
पण यासाठी तो प्रश्न त्या दर्जाचा असणं आवश्यक आहे जेणेकरून क्वोरा सर्च इंजिन वरून जास्तीतजास्त ट्रॅफिक स्वतःकडे आकर्षित करू शकेल, त्यातून काही उत्पन्न मिळवू शकेल. क्वोराच बिझनेस मॉडेल हे सर्व कीवर्ड, लिंक बिल्डिंग, मार्केटिंग चा प्रकार आहे, तुम्हाला हे कसं काम करत हे माहित असेल तर क्वोराच बिझनेस मॉडेल समजून घेणं सोपं जाईल.
तुम्हाला पडलेला प्रश्न हा नवीन असणं किंवा यथोचित बाजारमूल्य असणारा पाहिजे. त्याच आशयाचा प्रश्न जर आधी विचारला गेला असेल तर तुमचा प्रश्न त्यात संमीलित करून टाकला जाईल, इथं फक्त थोडा शब्दच्छल करून फायदा नाही क्वोरा अल्गोरिथम हे ओळखू शकतो. त्यामुळं रोज नवीन प्रश्न शोधणं, तो जाहिरातींबाबत व्यावहारिक असणं याला आणि याबरोबरीनेच त्या क्वोरा प्लॅटफॉर्म वर त्या विषयाला अनुसरण करणारे शेकडो किंवा हजारो ( काही प्रमाणात लाख सुद्धा ) यांची तुम्हाला स्पर्धा असेल.
उदारणार्थ म्हणून, मी विचारलेल्या एका प्रश्नाचा संदर्भ बघा. या नीट लक्ष दिलं तर किती जाहिरातीत या प्रश्नाचा संदर्भ आला (AD IMPRESSION), प्रश्नामुळं किती कमाई झाली (QUESTION EARNING) आणि त्या रिक्वेस्टमुळं (REQUEST EARNING) किती कमाई झाली इत्यादी माहिती क्वोरा स्वतः तुम्हाला देते.
याच बरोबर हा प्रश्न क्वोरा संकेतस्थळावर फक्त ३०% लोकांनी बघितलाय, आणि ७०% बघणारे इंटरनेट च्या माध्यमातून इथं वळलेत आणि कदाचित त्यातून या प्रॉडक्ट ची खरेदी झाली असण्याची पण शक्यता आहे, जेणे करून कुठं तरी कमिशन जनरेट झालय.
आता तुमच्या प्रश्नाला फक्त ट्रॅफिक मिळतेय म्हणून तुम्हाला पैसे मिळतीलच असं नाही, जसं माझा दुसरा प्रश्न बघा.
हा प्रश्न जवळपास 6400+ लोकांनी बघितलंय आणि 913 जाहितींमध्ये झळकलाय, पण यातून काही खरेदी झाली असण्याची शक्यता नाहीच कारण प्रश्नाचा विषय फक्त माहितीप्रद आहे, उलटपक्षी आधीच प्रश्न कुठंतरी वापरकर्त्याला खरेदी साठी उद्युक्त करतोय आणि कदाचित हे होतेय सुद्धा.
माझे दोन्ही प्रश्न नीट बघितलेत तर तुमच्या लक्षात आलं असेल कि त्या प्रश्नाला जाहिरातीच्या संदर्भाने बाजारमूल्य असणं का गरजेच आहे म्हणून. असो.
उलटपक्षी मराठी क्वोरा मध्ये हि कितपण यशस्वी होईल याबाबत मला तरी शंका वाटते.
उदाहरण पाहायचं तर क्वोरा मराठीवर मुख्यतः करून स्थानिक विषयांना जास्त प्राधान्य आहे, पण म्हणून आपल्याला पडलेला प्रश्न जेव्हा आपण गूगल किंवा इतर माध्यमातून शोधतो आपली भाषा हि इंग्रजीच असते. या सर्च मधून तुम्हाला काही प्रमाणात तुमच्या विषायानुसार मराठी लिंक्स चा संदर्भ मिळणं शक्य आहे पण हे प्रत्येक बाबतीत शक्य नाही.
आता, तुम्ही विचारलेला हाच प्रश्न घेतला तर तो तुम्हाला मराठीतच विचारावा लागेल तरच तुम्हाला या उत्तराचा क्वोरा मराठीची लिंक मिळू शकेल ( तुमचा प्रश्न जसाच्यातसा गूगल मध्ये टाकून पहा आणि मग तोच प्रश्न इंग्रजीत विचारून पहा – तुम्हाला अंदाज येईल ), आता महाराष्ट्रातील किती लोक गुगल मराठीत टायपिंग करून वापरात असतील तुम्ही अंदाज लावून गणित मांडून पहा – तुमची क्वोरा कडून कमाईची असलेली अपेक्षा आपोआपच कमी होऊन जाईल किंवा तूर्त तरी पूर्ण होईल अशी शक्यता कमी आहे .
आपण मराठी लोक कुठलीही माहिती शोधण्यासाठी मराठी चा वापर करत नाही अस म्हटलंय. पण इतर विदेशी भाषांचा विचार करता काही देशांमध्ये स्थानिक भाषा हीच इंटरनेट ची प्रमुख भाषा असते जसं जपान मध्ये जॅपनीज भाषा हे सर्व व्यवहाराचं माध्यम आहे. चीन मध्ये गुगल त्यांच्या मर्जी नुसारच काम करू शकत. अश्या देशांमध्ये जवळपास सर्व व्यवहार त्या विशिष्ट्य भाषेत चालत असल्याने अशी अनेक टूल्स किंवा पद्धती विकसित करून लोकं इंटरनेट वर सक्रिय राहतील अश्या सोयी सर्व मोठमोठी आस्थापने करत असतात.
आपल्याला ह्याची सवय नाही. उदाहरण द्यायचं तर, आपण गुगल ची मुख्य भाषा मराठी ठेऊन वापरू शकतो किंवा तुमची ऑपरेटिंग सिस्टिम मराठी मध्ये कन्व्हर्ट करून वापरू शकतो पण ह्याची आपल्याला मुळीच सवय नाही आणि काही दिवसातच आपण स्वतः पुनः इंग्लिश मोड मध्ये जातो.
मुद्दा हा कि आपण स्वतः मराठीला इंटरनेटच्या अश्या वापरासाठी अनिवार्य करत नाही किंवा मुख्य माध्यम बनवत नाही – तोपर्यंत मराठीच्या वापराच्या अश्या योजनेतून पैसे कमावणं फार कठीण बाब आहे.
याच विषयी तुम्ही माझं उत्तर Quora च्या व्यासपीठावर सुद्धा पाहू शकता.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.