वजन कमी करण्यात मदत करणारे 5 हिवाळी सूप (weight loss soups)

weight-loss-soup

Weight Loss Soups | हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू मानला जातो. हिवाळयात केलेल्या सकस आहाराच्या सेवनाने आणि व्यायामाने आरोग्यसुधारणेमध्ये इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त मदत होते.

गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये इतर ऋतूंच्या मानाने भूक थोडी जास्त लागते आणि सहजकच आपला हात हे दिसेल ते खाण्यावर येतो. अश्या वेळेला जर आपण जिभेची इच्छा पुरवण्यासाठी स्नॅक्स, चिप्स प्रकारचे खाद्य ग्रहण करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते खचितच योग्य नाही. थंड वातावरणात उबदार आणि पोषक घटक असलेलं अन्न खाल्ल्यानं तुमचं आरोग्य तर सुधारेलच पण जिभेचे लाड पण पुरवता येऊ शकतात.

सूप हे अश्या अन्नप्रकारांत येत जे तुम्हाला स्वाद तर देतंच पण दीर्घकाळ पोट सुद्धा भरतं, शिवाय पचायला हलकं असत आणि तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकते.

भाज्या आणि फळांचं सेवन हे नेहमीच आरोग्यदायी असत. यातून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक मुल्य मिळतातच पण जास्त शिजवलेल्या भाज्यांपेक्षा यांचे आरोग्याविषयी फायदे पण जास्तच असतात. भाज्या जास्त किंवा चुकीच्या पद्धतीनं शिजवल्याने त्यातील बऱ्याच पोषणमूल्यांचा नाश होत असतो – सुप यासाठी योग्य पर्याय आहे.

weight loss soups
वजन कमी करण्यात मदत करणारे हिवाळी सूप / Weight Loss Soups

हिवाळ्यात, तुम्ही डिहायड्रेटेड केव्हा होतो हे तुम्हाला कदाचित ओळखता येणार नाही कारण तुमच्या शरीराला काम करण्यासाठी ठराविक प्रमाणात पाण्याची गरज असते. तुम्ही तुमच्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष देत नसल्यास, आणि शरीर ठराविक प्रमाणात उबदारपणा राखू शकत नसेल तर थंड वातावरणातही तुम्ही डिहायड्रेटेड होऊ शकता. तुम्ही पाणी पिऊन किंवा पाणी जास्त प्रमाणांत असलेले पदार्थ खाऊन तुमची द्रव पातळी भरून काढू शकता. सूप हे असे अन्न आहे ज्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते आणि तुमच्या शरीराला पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.

तुमच्यात अगोदरच कुठल्या आजाराची लक्षण दिसत असतील तर तुम्ही पचनक्रिया हि मंदावलेली असते आणि कुठलाही अन्न ग्रहण करून पचवु शकत नाही त्यावेळी सुपंच सेवन हे अतिशय योग्य ठरते.

वजन कमी करण्यात मदत करणारे हिवाळी सूप / Weight Loss Soups

कोबी सूप / Cabbage Soup

पत्ताकोबी जास्तीतजास्त (भारतीय)चायनीज सारख्या आरोग्यासाठी चांगल्या नसलेल्या पदार्थांमध्ये वापरली जाते पण तिचे आरोग्यासाठीचे गुणधर्म खूप चांगले आहेत. अर्धा कप शिजवलेल्या कोबीमध्ये तुम्हाला दिवसासाठी आवश्यक असलेले एक तृतीयांश व्हिटॅमिन सी असते. हे तुम्हाला फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के आणि बरेच काही देते. पण कोबीमध्ये फायटोन्युट्रिएंट्स नावाच्या वनस्पती रसायन असतं जे आपल्या शरीरातील पेशींना निरोगी ठेवतं. तसेच जळजळ कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि अल्झायमर रोग यासारख्या आरोग्य समस्यांपासून तुमचे संरक्षण करण्यात मदत करते.

पत्ताकोबी, विशेषतः लाल कोबी, बीटा-कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर हृदय-संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढवते. हे “ऑक्सिडाइज्ड” LDL (Low Density Lipoprotein), ज्याला आपण “bad” कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखतो कमी करण्यास देखील मदत करते, ज्याचा संबंध रक्तवाहिन्यांच्या कडक होण्याशी आहे. आणि ते जळजळ कमी करत असल्याने, ते हृदयरोग टाळण्यास मदत करू शकते.

मटर सूप / Green pea soup

वजन कमी करणे आणि सूप यांचा नेहमीच चांगला संबंध आहे. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल आणि शरीर तंदुरुस्त असाल तर हिरव्या वाटाणा सूप तुमच्या आहारात एक उत्तम जोड असू शकते.

वजन कमी करणे आणि सूप यांचा नेहमीच चांगला संबंध आहे. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल आणि शरीर तंदुरुस्त असाल तर हिरव्या वाटाणा सूप तुमच्या आहारात एक उत्तम जोड असू शकते हिरवे मटार नैसर्गिकरित्या थोडे गोड आणि एक चवदारअसतात शिवार त्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन के, सी, फोलेट, मॅंगनीज, प्रथिने आणि फायबर यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सने भरपुर असतात.

टॉमॅटो गाजर सूप / tomato carrot soup

ताजे गाजर आणि टोमॅटो एकत्र येऊन ही लाळ तयार होण्यासाठी आवश्यक घटक पुरवतात. टोमॅटो गाजर सूप सौम्य मसाल्यांनी शिजवलेल्या दोन खाद्यपदार्थांचे मध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते वजन कमी करण्यास उपयुक्त असतं.

टॉमॅटो गाजर सूप / tomato carrot soup

बाजरीचे सूप / bajari soup

बाजरीचे सूप हे निरोगी आणि स्वादिष्ट दोन्ही आहेत. राजस्थान आणि गुजरातमधील पारंपारिक उबदार सूप असलेल्या “बाजरी सूप” हे सूप बाजरी राब म्हणून सुद्धा ओळखले जाते. बाजरी ग्लूटेन मुक्त आणि अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हे बनवायला देखील खूप सोपे आहे. या सूपमधील मुख्य घटक म्हणजे बाजरीचे पीठ, दही आणि चव वाढवण्यासाठी काही मसाले. हे स्तनपान करणा-या मातांना उत्तम पोषणमुल्य पुरवते.

शिवाय बाजरी (Bajara) किंवा भगर (Pearl Millet) यात भरपूर फायबर असल्याने ज्यांना कार्बोहायड्रेट कमी सेवनाची गरज आहे अश्या मधुमेहींसाठी सुद्धा उपयोगी आहे.

पालक सूप / spinach soup

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee