डिजिटल डिटॉक्स करण्याचे 7 मार्ग (7 Proven ways to digital detox in Marathi)

screen-time-issues

7 Proven ways to digital detox in Marathi – मागच्या दोन वर्षांच्या कोरोना दरम्यान आपल्या जीवनात बरेच बदल झालेत. आपल्या सवयी बदलल्यात, आहार बदलला, गरजा बदलल्यात, थोडक्यात काय तर कोरोनानें आपलं जीवन पार घुसळुन ठेवलय.

COVID-19 (COVID issues) महामारीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय म्हणुन सरकारद्वारे लागू केलेल्या पहिल्या लोकडाऊनची सुरवात झाली तेव्हा सर्व काही बंद होऊन आपण आपल्या घरट्यात कोंडले गेलो तेही बरीच महिने. बहुतेकांचं ऑफिसचं काम बंद, करायला फार काही नाही, अनेक लोक त्यांच्या घरी परत येऊ शकले नाहीत, अनेक परदेशी भूमीत अडकले आणि अनेक एकांतात. त्यात आपल्या रिलायंन्सने स्वस्तात आणि भरपूर डेटा देऊ केलेला – मग याची परिणीती झाली आपला डिजिटल उपकरणांचा वापर अनेक पटींनी वाढण्यात.

वेळ घालवायचा कसा अश्या विवंचनेत असणाऱ्यांना सोपा उपाय हातोहात सापडला (खरं म्हणजे आपल्या हातातच सापडला आणि तो म्हणजे – मोबाईल). लोकं तासनतास मोबाईल मध्ये डोकं घालून राहू लागलेत. अनेकांना टिकटॉक सारखं व्यसन लागलं. त्यातून कुणाचा आर्थिक फायदा झाला, कित्येकांना ऑनलाइन स्टारडम मिळुन पैसा कमावण्याचा एक मार्ग सापडला.

पण या काळापासुन अनेकांना मोबाइलचं जणू व्यसनच लागलं. अगदी मोबाईल घेऊन झोपणं, बाथरूम मध्ये सुद्धा मोबाईल शिवाय काम चालेनासं झालं. (Mobile bad impact on health)

Mobile Phone impact on health

स्क्रीन टाइम म्हणजे कार्यालयीन कामाचे नियोजित केलेले तास किंवा शैक्षणिक हेतू साठी केलेला डिजिटल उपकरणांचा वापर तसेच याव्यतिरिक्त विश्रांती आणि मनोरंजनासाठी युट्युबवर विडिओ पाहणं, गेमिंगचे अनियंत्रित तास, किंवा सोशल मीडिया वापरणे या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो, यासाठी डिजिटल उपकरणे वापरणे. या सर्व क्रियांसाठी तुम्ही व्यतीत केलेला वेळ हा स्क्रीन टाईम च्या व्याख्येत बसतो.

कार्यालयीन आणि शाळेसाठी डिजिटल उपकरणांचा वापर हा आवश्यक आणि सहेतुक आहे पण त्याव्यतिरिक्त इतर मनोरंजनासाठी या उपकरणांचा जास्त वापर हा नक्कीच टाळता किंवा आरोग्य दृष्ट्या कमी करता येण्यासारखा आहे.

हे मान्य की प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळं आपलं जीवन सुसह्य होत आहे पण त्यामुळं आधी नसलेल्या अनेक नवीन गोष्टी, समस्या सुद्धा निर्माण होत आहेतच.

यात भरीस भर म्हणुन मुलांच्या शाळा पण ऑनलाइन सुरु आहेत. घरातल्या मोठ्या व्यक्तींसारखाच मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल किंवा तत्सम डिजिटल उपकरणांचा वापर वाढला आहे. ऑनलाइन शाळेचे वर्ग सुरु असतांना मुलं आपोआप युट्युब किंवा इतर वेबसाइट्सवर वळतात हे चित्र आपण आज घराघरात पाहू शकतो.

डिजिटल उपकरणांचा अतिवापर झोपेपासून आपल्या सर्जनशीलतेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये व्यत्यय आणू शकतात येऊ आता तर संशोधनात सुद्धा आढळून येत आहे.

दर काही मिनिटांनी फोन तपासणी करणं, येणार प्रत्येक नोटिफिकेशन आपल्यासाठी असेल असं समजून तपासात राहणं आणि फोनला डेटा, चार्जिंग नसेल किंवा तो नजरेसमोर नसेल तर त्यासाठी जीव कासावीस होणं खरंच साधारण नाही – हि समस्या आरोग्याच्या दृष्टीने औपचारिकपणे एक विकार म्हणून ओळखले जात नाही पण मानसोपचारतज्ज्ञ याला नकारात्मक मानसिक प्रभाव मानतात.

7 Proven ways to digital detox in Marathi
स्क्रीन टाइम प्रॉब्लेम (SCREEN TIME PROBLEM)
  • जास्त वेळ कुठल्याही स्क्रीनकडे पाहिल्यामुळं आपण आपल्या डोळ्यांमधे कोरडेपणा, डोळ्यांवरती ताण, तीव्र प्रकाशामुळं अंधुक दृष्टी आणि सतत चुकीच्या आसनामुळे मान आणि खांदे यांचं दुखणं
  • डिजिटल उपकरणांमधला निळा प्रकाश झोपेला प्रोत्साहन देणारा हार्मोन मेलाटोनिन दाबून टाकतो, ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही.
  • समोरासमोर संवादाचा अभाव
  • व्यक्तींमध्ये असलेला भिडस्तपणा कमी होतोय. अनोळखी माणसांची बोलणं, नवीन मित्र बनवणं यासर्वांपेक्षा या गोष्टी ऑनलाइन करण लोकांना अधिक सोपं आणि आरामदायी वाटू लागलय

आपल्यासारख्या ९०च्या दशकात जन्माला आलेल्या व्यक्तीच आयुष्य लहानपणी खुप वेगळ होतं. आपल्याला करायला बऱ्याच गोष्टी होत्या. मोकळ्या पटांगणात खेळणं, मित्रांच्या घोळक्यात रमून राहणं आजच्या तुलनेत बरच सोपं होत. या काळात मोबाईक नव्हते म्हणुन आपल्याला असं जगावं लागलं असा एक युक्तिवाद केला जाऊ शकतो पण त्याजागण्यात सुद्धा एक प्रकारची मौज होती. आज आपल्याला डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत पण तो काळ जगलेल्याना आवश्यकतेपलीकडे वापराव्यतिरिक्त या गोष्टीचं फारसं अप्रूप नाही.

वर सांगितलेल्या काही समस्यांव्यतिरिक्त घरोघरी कमी होत असलेला संवाद सुद्धा एक परिवार म्हणून चिंतेचा विषय आहे. आधी सामानाची यादी बसून तयार केली जात असे आज आपण पुढे जातो आणि सामानाची यादी मागून व्हाट्सअप केली जाते.

छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवता येणार आनंद आपण आभासी जगात शोधतोय. सोशल मीडियावर जोडलेले शेकडो मित्र ज्यांना आपण कधी भेटलेलो सुद्धा नाही उद्या समाज कुणी समोर आलेत तर ओळखताना सुद्धा पंचाईत होते.

या आभासी जगापासुन थोडं दूर रहाणं फार गरजेचं आहे. मानवी मनाच्या आरोग्यासाठी, सकारात्मक मन जोपासण्यासाठी लोकांमध्ये मिसळणं, संवाद साधणं, पुस्तकांचं वाचन या थोड्या जुन्या गोष्टी वाटल्यातरी आवश्यक आहेत. जितकी जास्त हालचाल करता येईल तितकी करणं खरं तर ठरवून जास्त हालचाल, व्यायाम करणं हि तर न टाळता येण्याइतकी आणि रोजच्या दिनक्रमाचा भाग असण्याची गरज आहे. जेणेकरून वाढलेल्या वजनानंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या कदाचित टाळता येऊ शकतील.

डिजिटल डिटॉक्स या समस्येवर एक उपाय आहे.

डिजिटल डिटॉक्स कसे करावे? How to digital detox in Marathi

अतिरिक्त तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या मानसिक/शारीरिक आणि मनाच्या आरोग्याच्या मार्गात अडथळा आणत आहे. तुमच्‍या डिजिटल उपकरणांपासून कामाव्यतिरिक्त दूर राहून आपलं आरोग्य जपण्यासाठी या रणनीती तुम्हाला फायदेशीत ठरू शकतील.

डिजिटल डिटॉक्स करण्याचे 7 मार्ग | 7 ways to digital detox in Marathi

आपल्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या कारणांच्यामुळे बहुतेक लोकांसाठी, तंत्रज्ञान पूर्णपणे दुर्लक्षित करणं हे होणार नाही त्यामुळे शक्य असेल तेव्हा डिजिटल उपकरणांच्या वापरामध्ये कपात करणे अधिक वास्तववादी दृष्टिकोन असेल.

या सर्व समस्यांपासून तुम्ही स्वतःला कसं दूर ठेवता, डिजिटल डिटॉक्सची तुम्ही पद्धती काय हे आम्हाला टिप्पण्यांमध्ये नक्की कळवा याचा वाचकांना नक्की फायदा होईल.

आपल्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या कारणांच्यामुळे बहुतेक लोकांसाठी, तंत्रज्ञान पूर्णपणे दुर्लक्षित करणं हे होणार नाही त्यामुळे शक्य असेल तेव्हा डिजिटल उपकरणांच्या वापरामध्ये कपात करणे अधिक वास्तववादी दृष्टिकोन ठरतो.

पण तसा विचार करता नक्की किती वेळ आपण डिजिटल उपकरणांसोबत घालवावा असं काहीही प्रमाण नाही, या एका ठराविक/मर्यादित वेळेनंतर आपल्याला डिजिटल डिटॉक्स करायची गरज लागेल याचं प्रमाण मात्र प्रत्येक व्यक्तिगणिक बदलेल.

दिवसभरात स्क्रीन टाइम टाळण्यासाठी शेड्यूल तयार करा | Create a schedule to avoid screen time

तुम्ही संगणकावर काम करत असल्यास, स्क्रीन टाळणे कठिण आहे, याचा अर्थ कामाव्यतिरिक्त स्क्रीनपासून जसे जमेल तसे दूर राहण्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्‍या कॅलेंडरमध्‍ये वेळ सेट करा किंवा तुमच्‍या फोनवर अलार्म लावून तुम्‍हाला फिरायला जाण्‍याची किंवा तुमच्‍या डेस्कपासून दूर दुपारचे जेवण खाण्‍याची आठवण करून द्या. आणि हो हे करतांना तुमचा फोन बरोबर नेण्यासाठी विसरण्याचे लक्षात ठेवा.

तंत्रज्ञानापासून ठरावीक वेळेत छोटे छोटे ब्रेक घेत राहा | Take small break from technology

कामातून घेतलेले छोटे छोटे ब्रेक्स तुमचा तणाव कमी करू शकतात. तुमच्या फोनवरून समस्याप्रधान अॅप्स तात्पुरते किंवा चांगल्या कारणांसाठी हटवण्यासारख्या प्रक्रीयेमुळे तुम्ही डिजिटल डिस्कनेक्ट करण्यास वचनबद्ध असलेल्या इतरांमध्ये सामील होउ शकता.

उदारणार्थ, जर तुम्ही Facebook किंवा Instragram सारख्या ऍप्सवर तुम्ही सारखे सारखे क्लिक करत असाल आणि दीर्घकाळ स्क्रोल करत असाल तर, या ऍप्सपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही या अँपसाठी ठराविक काळ देऊन त्यांचा वापर उर्वरित दिवसासाठी पूर्णपणे लॉक करू शकता यासाठी तुम्हाला स्क्रीनटाइम ऍप्स मदत करू शकतील.

तुमचा फोन डाउनग्रेड करा | Downgrade your phone

तुमचा फोन हा जर स्मार्टफोन असेल तर तो डाऊनग्रेड करा हे ऐकायला आणि प्रत्यक्षात आचरणात आणायला आजच्या वेळेत थोडे कठीण आहे. पण लक्षात घ्या आज सुद्धा असे बरेच वयाने थोडी मोठी व्यक्ती आहेत जे फोने पूणर्पणे किंवा अगदी साधी फोन वापरतात – आणि त्यामुळं त्यांचं फारसे काहीही बिघडत नाही, पण यामुळे हे पण मान्य आहे कि आज आपण करीत असलेली अनेक काम त्यांना स्वहस्ते किंवा प्रत्यक्षात करावी लागतात.

तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या अश्या एप्स ज्या नसल्यातरी तुमचं व्यवसायाचं/ऑफिसचं (आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचं) अडत नसेल तर त्या ऍप्सना सपोर्ट करू शकत नसलेल्या फोन वापरणं डिजिटल डिटॉक्ससाठी गरजेचं आणि अतिआवश्यक आहे.

विशिष्ट वेळी तुमचा फोन बंद करा | Switch off your phone time to time

आपल्या स्वतःसाठी आणि परिवासाठी पुरेसा वेळ काढण्यासाठी सायंकाळच्या जेवणापासून ते दुसऱ्या दिवशी आपली सर्व कामे आवरून ऑफिसवर्क सुरू करण्यापूर्वी आपला फोन आणि त्यावर येणारी नोटिफिकेशन्स बंद ठेवा.

काही ऍप्सचा वापर मर्यादित करण्यासाठी तुमची फोन सेटिंग्ज बदला | Change your phone setting to limit access time unwanted phone apps

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनमध्ये या सेटिंग्ज दिलेल्या असतात ज्यांचा वापर करून आपण आपल्याक हव्या असलेल्या अप्सच्या वापरासाठी वेळेची पर्यादा ठरवून ठेऊ शकतो जेणेकरून आपण या वेळेव्यतिरिक्त जर या ऍप्सचा वापर करणार असू तर आपल्याला नोटिफिकेशन देऊन किंवा आपल्याला ऍप्सचा वापर उर्वरित दिवसासाठी लॉक केला जातो – याला ऍप्सचा डाउनटाइम सेट करणे म्हणतात.

आपण ऑफिस किंवा व्यावसायिक कारणांसाठी अतिआवश्यक आणि टाळता ना येणाऱ्या ऍप्सना या यादीतून वगळून ते वापरू शकतो पण अश्या ऍप्सची निवड मात्र तुम्हांला प्रामाणिकपणे करावी लागेल अन्यथा या सर्वांचा काहीच उपयोग होणार नाही.

नो-फोन झोन तयार करा | Create a no-phone zone in home

आपण या लेखात बोलत असलेले हे उपाय अनेकवेळेस आपल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या कमतरतेमुळे हवा तास परिणाम देत नाहीत तेव्हा थोडा कठोर उपाय म्हणून आपण स्वतःला डिजिटल उपकरणांपासून ठराविक वेळेसाठी पूर्णपणे तोडण्यासाठी आपल्या घरात एक “नो-फोन झोन” बनवू शकतो.

मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा विचार करा | Connect for professional help

तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो टाळता येणं सर्वथा अश्यक्य आहेच पण म्हणून त्याचा योग्य वापर कसा करावा हे प्रामाणिकपणे ठरवणे प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. आपल्यापैकी कितीतरी लोक त्याव्ह अखंड वापर करतात आणि त्यापासून होणाऱ्या समस्यांना तोंड पण देत असतात पण प्रामाणिकपणे हे स्वीकारायला नकार देतात कि यांचं मूळ हे फोन किंवा इतर डिजिटल उपकरणांच्या अतिवापरात आहे.

तंत्रज्ञान समस्या नाहीच पण त्याचा योग्य वापर करणे माहिती नसणे हि खरी समस्या आहे. जर तुमची वर्तणूक किंवा तंत्रज्ञान किंवा विशिष्ट ऍप्स तुमच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणू लागल्या, तर व्यावसायिक मदत घेण्याची वेळ येऊ शकते.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

3 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee