जीवन बदलणाऱ्या सवयी | 5 Life Changing Habits in Marathi
आपल्या जीवनात यशस्वी होण्यामागं सवयीचा फार मोठा प्रभाव असतो. यशस्वी होण्यासाठीं चांगल्या सवयी आत्मसात करणे आणि त्यांना कधीही अंतर न देणं फार आवश्कय आहे.
बदलत्या वेळेनुसार आपल्या प्राथमिकता सुद्धा बदलत असतात. वयपरत्वे येणाऱ्या आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला जीवनात बराच संघर्ष करावा लागू शकतो आणि त्यासाठी चांगलं मनोधेर्य आणि आत्मविश्वास हवा असेल तर तो चांगली सवयींनी मिळवता येऊ शकतो.
जीवनात कितीही संकट आलीत किंवा वेळ बदलली तरी काही चांगल्या सवयी कधीही सोडायल नकोत. तुम्ही कुणीही असा लहान, मोठे, व्यावसायिक किंवा नोकरदार काही सवयी अश्या असतात कि त्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणायची सकाठी ठेवतात त्यासाठी फक्त तुमचं सातत्य आणि थोडी चिकाटी असणं महत्वाचं आहे.
यश कुणाला नको असतं पण आपल्या पूर्ण शक्तीनुसार त्यासाठी सतत झगडत असतो. त्या सर्व गोष्टींमध्ये पूर्ण शक्ती ओतून काम करतो ज्यामुळं आपल्याला यश, प्रसिद्धी आणि आर्थिक सुबत्तता मिळु शकेल – जेणेकरून आपण आपल्याला हवं तास जीवन जगू शकु, आनंद प्राप्त करू शकू.
चला तर पाहुयात काही जीवन बदलणाऱ्या चांगल्या सवयींबद्दल –
Life-Changing Habits in Marathi यापैकी तुम्हांला जमतील त्या सवयीं आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा.
सकाळी लवकर उठण्याची सवय | Habit of getting up early in Morning
काही कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे पहाटेच्या साखरझोपेचा त्याग – बहुतेकांना खरंच जमत नाही. सकाळी लवकर उठणं (benefits of getting up early) आणि दिनचर्येला सुरवात करणं खरंच कठीण काम आहे विशेषतः जर थंडीचा ऋतू असेल किंवा रविवार – काही झालं तरी बेहत्तर पण अनेक लोकं हा आराम सोडायला तयार नसतात.

सकाळी लवकर उठुन सुरवात करण्याऐवजी रात्री थोडं जास्त जागरण करून काम संपविण्यावर त्यांचा भर असतो – पण यामुळं फक्त वेळेची भरपाई होऊ शकते पण ज्या उद्देशासाठी आपण लवकर उठलं पाहिजे त्याची नाही.
चांगल्या सवयी आत्मसात करण्याची सुरवात जर यांपासूनच करायची असेल तर हे मात्र आपल्याला जमण्यासारखं नाही अशीच अनेकांची भावना असते.
सकाळी लवकर उठण्याच्या सवयींबद्दल आपण लहानपणा पासून ऐकत असतो पण या सवयीचा समावेश अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग नसतो हेच वास्तव आहे.
पण लवकर उठणं म्हेणजे नक्की कधी? किती वाजेला? याचा नाकी मला फायदा काय? प्रश्न प्रश्न मनात येतात. चला माहिती करून घेऊयात.
खरं सांगायचं तर लवकर म्हणजे कुठली ठराविक वेळ नाहीच याच उत्तर प्रत्येक व्यक्ती मागे बदलू शकतं. लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर आणि तुम्ही दैनंदिन कामाची सुरवात करण्याला सुरवात करण्याआधी तुमच्या स्वतःसाठी कमीतकमी तास- दोन तास तुम्हांला वेळ मिळेल अशी सोया तुम्ही पाहून तुमच्या सकाळच्या उठण्याची वेळ तुम्ही स्वतःच ठरवू शकतात.
तुम्हाला रोज मिळणार हे तास-दोन तासांचा वेळ तुमच्या स्वतःचा सर्वांगीण विकासासाठी जे काही करायला गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही देऊ शकता.
ऋतू कुठलाही असला तरी प्रातःकाळी केलेला अभ्यास किंवा व्यायाम हा अधिक लाभदायक असतो, यामुळेच आपल्या घरातील मोठं लोक आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचा आग्रह करीत असतं. या सर्व गोष्टीमुळं तुमचं मन शांत राहत, कामात लक्ष लागत आणि थोडक्यात तुमची दिवसभरासाठी उत्पादकता चांगली असते.
नियमित व्यायाम किंवा योगा | Habit of Regular Exercise & Yoga
आरोग्यासारखी दुसरी संपत्ती नाही पण ते मिळवणं आणि टिकवणं सोपं काम नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत हि घ्यावीच लागते. यासाठी एकमेव उपाय म्हणजे नियमित थोडा व्यायाम किंवा योगाभ्यास करणे.

सकाळी लवकर उठल्यानंतर दुसरं कठीण काम म्हणजे व्यायाम आणि तो पण रोज – बहुतेकांना याचा कंटाळा येतो. हे करण्यासाठी तुम्हांला योग्य इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात होणारे बहुतेक आजार हे बैठया कामाच्या पद्धतीने आणि अनियंत्रित वजनामुळं होतात हे समजून घेण्यासाठी या विषयातलं तज्ज्ञच असलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही कुठल्याही कारणांसाठी डॉक्टरला भेटलात तर तो तुम्हांला या २ गोष्टी विचारतो कारण तुमची जीवनशैली त्याला तुमच्याबद्दल बराच काही सांगून जाते.
तुमची इच्छाशक्ती असेल तर आरोग्य सुदृढ ठेवणं काही फार मोठं कथिक काम नाही पण हि गोष्ट मेहनतीशिवाय मिळणारी नाही हे पण तितकंच खरं आहे.
फारसा व्यायाम जमत नसेल तर तुम्ही रोज फक्त ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम नक्कीच करू शकता. वरच्या मजल्यावर राहत असाल तर लिफ्टचा वपन पूर्णपणे बंद करून जिन्याचा वापर करू शकता. कुठलाही थोडा व्यायाम करून आपण घाम काढू शकत असाल अशी कुठलीही सोपी व्यायाम पद्धती तुम्ही सुरवात करू शकता – अगदी १ महिन्यांचा वेळ तुम्हांला सकारात्मक परिणाम दिल्या शिवाय राहणार नाही.
दररोज काहीतरी नवीन शिका | Learn Something New Everyday

प्रत्येक यशस्वी व्यक्ती याच आचरण करते याचाच अर्थ रोज नवीन काहीतरी शिकणं काही अश्यक्य गोष्टी नक्कीच नाही.
यशस्वी होण्यासाठी असो किंवा चांगला पैसा कमावण्यासाठी उद्देश काही असला तरी तुम्ही स्वतःला अपग्रेड करत नसाल तर तुम्ही माग पडाल. यशस्वी होण्याची गुरुकिल्ली हवी असेल तर अर्थपूर्ण आणि व्यावहारिक कामांमध्ये तुम्हला उपयोगी ठरेल असं काहीही तुम्ही नेहमी शिकत राहिलं पाहिजे – स्वतः चौकस द्रुष्टीने इतर गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर रोज काहीनाकाही शिकू शकाल.
विद्यार्थी, नोकरीपेक्षा किंवा व्यावसायिक प्रत्येकाला नेहमी कुठल्या परिस्थितीशी सामना होतोच आणि हि एक normal life आहे. या सर्व गोष्टींना आपण कसं सामोरे जातो त्यातून काय शिकतो – हे सर्व एक उत्तम अनुभव देतात आणि स्वतःच्या अनुभवातुन शिकण्यासारखं उत्तम साधन नाही.
अश्या अकस्मात किंवा नवनवीन गोष्टींना समोर जाण्याचा आत्मविश्वास तुम्हांला मिळवायचा असेल तर व्यावहारिक शिक्षण असावं, काहीतरी वेगळं आणि उपगोगी ठरेल असें सतत शोधात राहून ते आत्मसात करण्याची उर्मी असावी.
लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या टीममध्ये सर्वोत्तम काम करत पण असाल तर तुम्ही चुकीच्या टीम मध्ये आहात असं समजा. तुम्ही त्यापेक्षा सुद्धा उत्तम काम करू शकता पण त्यासाठी तुम्ही थोडी मेहनत घेऊन स्वतःला सतत upgrade करत राहिलं पाहिजे.
कामांची यादी बनवा | Create and Execute your To Do list

तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रांत काम करत असाल तर तुम्हांला to-do list माहिती असेलच पण to-do list चा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा तितक्याच प्रभावीपणे करू शकतो.
आपण कुठली काम करणे गरजेचं आहे याची यादी म्हणजेच to-do list. कुठल्या कामाचा अधिक प्राधान्य द्यावं, कुठली काम अधिक आवश्यक आहेत (priority work items), त्या कामांची प्रगती (tracking work progress) आदी सर्व तुम्ही योग्य पणे नोंद ठेवत असाल तर तुम्हाला हि कामं हातावेगळी करणे सोपं जाईल.
आजच्या जीवनात प्रत्येकाला multi tasking जमायला हवी असा एक अलिखित नियम आहे किंबहुना ती एक गरजच बनलीय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
पण एकाच वेळी अनेक गोष्टी करणे सर्वाना जमेलच असं नाही. त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनेकदा बऱ्याच गोष्टी करतांना कुठल्या महत्वाच्या गोष्टींकडे अजाणता दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळं काम अटकू शकतात.
todo list च योग्य नियोजन करून, work priority set करून, work progress track करून तुम्ही कुठली काम किती प्रमाणात पूर्ण केलेली आहेत हे योग्य पणे बघू शकता. तुम्ही productivity वाढण्यासाठी ही सवय स्वतःला लावून घ्या. यामुळं तुमची काम तर वेळेवर पूर्ण होतीलच पण अपूर्ण कामामुळं येणारे work stress किंवा extra working hours सुद्धा तुम्ही कमी करून शकता.
सतत व्यस्त राहा | Stay busy in Important Tasks

आजच्या धकाधकीच्या जीवनात मोकळा वेळ मिळत नाही हि प्रत्येकाची तक्रार आहे आणि त्यात तथ्य सुद्धा आहे आणि मी तर तुम्हाला सतत व्यग्र राहायला सांगत आहे – हे अजब आहे असं तुम्हांला वाटावं यात काही नवल नाही.
शरीराला आणि मनाला आराम मिळत नसेल तर आपल्या उत्पादकतेवर परिणाम होतो हे सर्वमान्य आहे आणि सतत कामात गाडून घेऊन आपण नक्कीच प्रगती कशी करणार – असे वाटणं स्वाभाविक आहे.
मग इथं नक्की सतत व्यस्त राहण्याचा अर्थ काय? चला जाणून घेऊयात.
सतत व्यस्त असणं म्हणजे तुम्ही करत असलेलं मनोरंजन, झोप वगैरे कमी करावं असं अजिबात नाही.
प्रत्येकाला २४ तासांचा वेळ मिळतो. यात ८-९ तास आपल्या साठी जातात, कमीत कमी ७-८ तास रात्रीच्या झोपेत, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रवासांत १-२ तास आणि असाच दिवस घालवल्यानंतर आपल्या हातात उडणाऱ्या २ ते ४ तास जे आपण अधिक चांगल्या प्रकारें वापरू शकतो.
अश्या उरलेल्या २-४ तसंच अवधी कुठलीही यशस्वी व्यक्ती किती प्रभावीपणे वापरते याचंच थोडं अनुसरण करणं आपल्याला शिकायचं आहे. सामान्य व्यक्ती साधारणपणें मनोरंजन वगैरेंमध्ये हे घालवतो पण त्यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो.
यशस्वी व्यक्ती या फावल्या वेळेत पुस्तक वाचन, लेखन, आपले छंद जोपासणे वगैरें कामांमध्ये आपलं मन गुंतवतात. तुम्ही यापद्धतीने तुम्हांला गुंतवणून ठेवण्याची सयय लावून घेतलीत तर आळस, नकारात्मक विचार, चिंता या सर्वांपासुन मुक्त राहू शकाल.
आपण आतापर्यंत वर पाहिलेल्या या सवयी काही फार विशेष नाहीत आणि आपल्यापैकी कितीतरी लोक हे करत सुद्धा असणार. पण काही ना काही कारणांमुळे आपण एका ठराविक मर्यादेनंतर या गोष्टींचा कंटाळा करू लागतो किंवा आपोआप त्या बंद होऊन जातात – ते होऊ नये म्हणून या लेखाचं प्रयोजन.
तुम्हांला जीवन बदलणाऱ्या सवयी (5 Life Changing Habits in Marathi) लेख कसा वाटला कंमेंट मध्ये आम्हांला नक्की कळवा, तुम्हाला तहे लेख उपयोगी आहे असं वाटत असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
या किंवा अश्याच इतर चांगल्या सवयींच्या आचरणातून तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडवून आणलेत आम्हांला नक्की कळवा.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.