2-Minute Mental Health Workout (तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी 2 मिनिटांची मानसिक आरोग्य कसरत)
आज आपली जीवनशैली फारच गुंतागुंतीची आणि व्यस्त झालेली आहे. त्यातचं कोरोना नंतर जवळपास प्रत्येकजण घरून काम करत असल्यामुळे स्वतःसाठी थोडासाही वेळ काढणं जमतच नाही. सतत कामाचं टेन्शन, लागोपाठ असलेल्या मिटींग्स हि सध्या प्रत्येकाच्या घरात दिसणारी सामान्य परिस्थिती आहे. हे व्यस्त वेळापत्रक आणि मल्टीटास्किंगमुळे आपल्यात तणाव निर्माण होतो आणि आपल्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतोय.
सतत कामाच्या गराड्यात राहिल्याने तुमच्या दैनंदिन आयुष्यावर, उत्पादकतेवर परिणाम होतो. कोरोना नंतर जश्या या समस्या वाढायला लागल्यात तेव्हा समुपदेशकानीं आपल्याला केव्हाही करता येईल अशी २ मिनिटांची मानसिक आरोग्य कसरत शेअर केलेली आहे. या छोट्याश्या कसरतीने तुमचं मन थोडं शांत होईल – हा श्वासोच्छवासाचा एक सोपा व्यायाम आहे जो कुठंही करता येईल.
समुपदेशक म्हणतात जेव्हा तुम्ही कुठलाही ब्रेक न घेता सतत कामात असता दिवसाच्या शेवटी तुम्हाला मानसिक थकवा जाणवणं फार स्वाभाविक आहे कारण सततच्या कामाने आपला मेंदू थकतो. तुमचं मन थोडक्यात रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही हि सोपी श्वासोच्छवासाची पद्धती वापरून अगदी तुमच्या मिटिंग मध्ये सुद्धा करू शकता, त्यामुळं प्रत्येकाच्या त्याच्या कामाच्या कडक वेळापत्रकात याचा समावेश करून पाहुन त्याचे सकारात्मक परिणाम पाहिले पाहिजेत.
२ मिनिटांची मानसिक आरोग्य कसरत (2-minute mental health workout)
श्वासोच्छवासाचा व्यायाम कसा करावा? / 2 Minute Breathing Exercise
श्वास घेणे ही जीवनाची स्वाभाविकपणे होणारी क्रिया आहे यातून आपण हवेत श्वास घेतो तेव्हा रक्त पेशी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. श्वास घेण्याच्या अयोग्य श्वासोच्छवासामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण बिघडू शकते आणि त्यामुळे चिंता, पॅनीक अटॅक, थकवा आणि इतर शारीरिक आणि भावनिक त्रास होऊ शकतो.
दीर्घ श्वास घ्या, श्वास रोखून धरा आणि श्वास सोडा. हे 10 वेळा पुन्हा करा, ज्यास 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. (Breathing exercise benefits in Marathi)

उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक सोप्या टिप्स: (Breathing exercise benefits in Marathi)
- मल्टीटास्किंग करू नका
- कामाची यादी एक रात्री आधी किंवा सकाळी तयार करा
- जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा टू-डू लिस्टमधून गोष्टी कमी करत रहा
- विचलन दूर करा
- आशावादी राहा आणि पुरेशी झोप घ्या
Note: या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरून संकलित केलेली आहे.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.