Small Savings Scheme योजनेत गुंतवणुक करून सुरक्षित परतावा मिळवा (small savings scheme in marathi)

small-saving-investments

Small Savings Scheme in Marathi | गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकार तर्फे अनेक गुंतवणूक योजना बनवलेल्या आहेत. सरकार पुरस्कृत असल्यामुळें या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि निश्चित परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.

Small Savings Scheme in Marathi

या लेखात आपण जाणुन घेणार आहोत अश्याच काही अल्पबचत गुंतवणूक योजनांबद्दल ज्या तुम्हांला सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याची कमी देतात.

प्राथमिक पणे अल्पबचत योजना या भारतीय डाक विभागामार्फत पुरवल्या जातात. पण सध्या यापैकी काही योजना तुम्ही काही ठरावी की बँकांमार्फत सुद्धा घेऊ शकता.

भारतीय डाक विभाग या गुंतवणूक योजनांच्या ऑनलाईन सुविधा देण्यासाठी Indian Post Payments Bank खात्याची सुद्धा सुविधा देतो. IPPB हे एक zero-balance savings account & mobile app आहे ज्याचा उपयोग तुम्ही या योजनांमध्ये पैसे टाकण्यासाठी करू शकता त्यासाठी दरवेळेस पोस्टाच्या शाखेत जाण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त तुमचे युटिलिटी बिल भरणे, गुंतवणूक, पैसे पाठ्वण्या आदी सुविधासुद्धा तुम्ही वापरू शकतात.

सुरक्षितता आणि या योजना साधारणपणें ६%च्या जवळपास किंवा त्याहून जास्तंच व्याज देऊ करतात जे सध्याच्या चलनवाढीच्या समप्रमाणात आहे त्यामुळें या योज़ना फार लोकप्रिय आहेत. पण सरकारी गुंतवणुक योजना असल्यानें अनेकदा नवखे गुंतवणुकदार “करपात्र उत्पन्न” हा विषय सपशेल विसरतात. त्यांमुळे बहुतेकांना चांगला परतावा जरी मिळत असला तरी तो करपात्र असतो आणि करवजावटीनंतर हाती येणारी रक्कम हि कमी असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना ग्राहकांनी हेही पाहिले पाहिजे की परताव्यावरील कर दायित्व जास्त नाही.

SMALL SAVINGS SCHEME IN MARATHI / अल्पबचत गुंतवणूक योजना

1. पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF in Marathi)

पब्लिक प्रोविडेंट फंड / PPF हि योजना EEE category मध्ये येते. म्हणजेच PPF योजनेत तीन स्तरांवर कर सूट उपलब्ध आहे. या योजनेत, कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर उपलब्ध आहे. त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळी काढलेले पैसेही पूर्णपणे करमुक्त आहेत.

PPF योजनेबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा.

2. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY देखील EEE category येते. येथे केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत देखील करमुक्त आहे. याशिवाय व्याज आणि पैसे काढण्याची रक्कम देखील करमुक्त आहे. या योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना फक्त मुलींसाठी बनवलेली विशेष योजना आहे. पालक आपल्या एका परिवातील १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जास्तीत-जास्त २ मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जेव्हा मुलीया जन्मजात तिळ्या असतील तरंच तिसऱ्या मुलींसाठी खात उघडण्याची परवानाही मिळू शकते.

अधिक वाचा – मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक पर्याय (Investment Options for Your Girl Child)

3. नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स (NSC in Marathi)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रां किंवा नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स (NSC) मधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. या योजनेतील मुदतपूर्तीवर मिळणारे व्याज करपात्र आहे. हे व्याज गुंतवणूकदाराच्या एकूण वार्षिक उत्पन्नात जोडले जाते आणि गुंतवणूकदाराला त्याच्या सध्याच्या टॅक्स ब्रॅकेट नुसार त्यांवरती कर भरावा लागेल.

4. मासिक आय योजना (MIS in Marathi)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न / MIS in Marathi योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर सवलत नाही. तथापि, व्याज उत्पन्न करपात्र आहे. निवृत्तीनंतर या योजनेमध्यें गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लाक्षणिक आहे. एकरकमी पैसे भरून त्यातून येणाऱ्या चांगल्या व्याजदरांमुळे महिन्याला इतर गुंतवणुकीपेक्षा चांगले रिटर्न्स मिळवता येतात शिवाय निवृत्त लोकांच्या टॅक्सकरपत्र उत्पन्न फार नसल्यास ते यातून कर सुद्धा वाचवू शकतील अशी याची रचना आहे.

5. किसान विकास पत्र (KVP in Marathi)

किसान विकास पत्र म्हणजेच KVP मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा कोणताही फायदा नाही. या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते, ज्यावर कर स्लॅबनुसार कर मोजला जातो.

6. आवर्ती ठेव योजना (Post Office Recurring Deposits in Marathi)

लहान बचत योजनांमध्ये आरडी ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. दरमहा छोट्या बचतीतून मोठे भांडवल जमा करण्याची ही चांगली योजना आहे. या योजनेत मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते, ज्यावर स्लॅबच्या आधारावर कर आकारला जातो.

7. सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS in Marathi)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेवी आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ देतात. त्याच वेळी, जर व्याजाचे उत्पन्न एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस कापला जाईल. 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर ज्येष्ठ नागरिक आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत सूट मागू शकतात.

8. टाइम डिपॉजिट (Post Office Time Deposit Scheme in Marathi)

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) योजना बँक FD प्रमाणे काम करते. प्राप्तिकर कलम 80C अंतर्गत कर लाभ फक्त पाच वर्षांच्या वेळेत जमा केल्यावर उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत प्राप्त होणा रा परतावा करपात्र आहे.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee