पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना काय आहे? ppf account in marathi

ppf-in-marathi

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना काय आहे? PPF Account in Marathi

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ हि भारत सरकार पुरस्कृत गुंतवणूक योजना आहे. PPF योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना दिर्घमुदतीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहित करून सेवानिवृत्तीचे नियोजन देणे असा होता. PPF योजनेच्या प्रारंभापासून ही गुंतवणूक फार लोकप्रिय आहे. पीपीएफ हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सर्वोत्तम कर-प्रभावी गुंतवणूकीचे साधन मानले जाते.

आधी सांगितल्याप्रमाणे PPF योजना सरकार पुरस्कृत असल्यामुळे ती सुरक्षित नि निश्चित परताव्याची हमी देते. तसेच PPF हि Exempt-Exempt-Exempt (EEE) प्रकारांत मोडते. Exempt म्हणजे सूट.

Exempt-Exempt-Exempt संकल्पना थोडक्यात स्पष्ट करायची म्हणजे (EEE Investment Benefits )-

 • PPF योजनेमध्ये केलेल्या एका वर्षातील दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत वजावट घेता येते
 • PPF खात्यावर जमा होणारे वार्षिक व्याज सुद्धा करमुक्त असते
 • १५ वर्षे झाल्यावर PPF योजना मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्या PPF खात्यांतील जमा धनराशी काढतांना संपुर्ण रकमेवरती करातून सूट मिळते.

पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये (PPF Account Rules in Marathi)

 • पीपीएफ ही १५ वर्षांच्या मुदतीसाठीची दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ खातं उघडल्यापासून पुढील १५ वर्षं पूर्ण होईपर्यन्त या खात्यातून तुम्ही पैसे काढू शकत नाही. अर्थात, यासाठी काही अपवाद आहेत.
 • PPF खात्याची १५ वर्षांची मुदत पूर्ण आल्यानंतर तुमची इच्छा असल्यास तुम्ही जे खातं ५ वर्षांच्या मुदतीसाठी पुन्हा सुरु ठेऊ शकतात आणि हे तुम्ही हवं तितक्या वेळेला करू शकतात.
 • नियमानुसार एक व्यक्ती फक्त एक आणि एकचं PPF खातं उघडू शकते जे तुमच्या पॅनकार्ड (Pancard) आणि आधार कार्डाशी (Aadhar Card) जोडले जाते. त्याशिवाय कुठलाही पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर खाते उघडू शकते – पण दोन्ही खात्यांची मिळुन एका वर्षाची गुंतवणुकीची मर्यादा हि १. लाखचं राहील, तुम्हांला ती वाढवुन मिळणार नाही. त्यामुळं कारवाचवण्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही.
 • पीपीएफ चे संयुक्त खाते (PPF joint account not allowed) उघडण्याची सुविधा नाही येत नाही परंतु तुमच्या खात्याला नामनिर्देशन देण्याची सुविधा दिलेली आहे. (PPF nomination is allowed)
 • एका आर्थिक वर्षात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये भरून खातं सुरु ठेऊ शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुक मर्यादा १,५०,००० रुपये आहे. हि गुंतवणुक एकरकमी किंवा १२ किंवा त्यापेक्षा कमी हप्त्यात केली जाऊ शकते. एका आर्थिक वर्षात किमान ठेव न केल्यास तुमचं खातं निष्क्रिय केलं जात आणि ५० रुपये दंड तुम्ही ते पुनश्च सुरु करून घेऊ शकता.
 • महिन्यातील ५ व्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी खात्यात उपलब्ध असलेल्या सर्वात कमी रकमेवर व्याज मोजले जाते. म्हणून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला किंवा त्यापूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा करण्याचा सल्ला दिला जातो.
 • वित्त मंत्रालयाने तिमाही आधारावर पीपीएफ खात्याचा (Quarterly Interest declared on PPF scheme) व्याज दर जाहीर केलेला असतो. वर्षाचे एकूण व्याज फक्त आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्च ला पीपीएफमध्ये जोडले जाते. फक्त व्याज जमा केले जाते.
 • योजनेच्या मुदतीमध्ये खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद करून खात्यातील जमा शिल्लक राशी नामनिर्देशित व्यक्तीला (Nominee) किंवा खात्यात नामनिर्देशित नसल्यास कायदेशीर वारसांना(legal hairs) दिले जाते.
 • PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमार्फत खातं उघडू शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिसात खातं उघडणार असाल तर तुम्हांला कुठल्याही कामांसाठी तिथं चकरा मारण्याची तयारी ठेवा. त्यापेक्षां बऱ्याचं बँक तुम्हाला या सर्व सेवा ऑनलाईन देतात आणि तुमचं खातं वापरणे तुम्हाला थोडं सोयीचं होत – हा माझा अनुभव आहे.
 • पीपीएफ खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत किंवा त्याउलट बँकेतून पोस्ट ऑफिसात हस्तांतरित करण्याची परवानगी आहे.

अनिवासी भारतीय आणि पीपीएफ (PPF for non-resident Indians)

नवीन पीपीएफ खात उघडण्याची परवानगी फक्त स्थानिक भारतीय नागरिकाला आहे. अनिवासी भारतीय नवीन पीपीएफ खातं उघडू शकत नाहीत (NRI can not open new PPF account) . पण अनिवासी होण्यापूर्वी जर कुणी पीपीएफ खातं सुरु केलेले असेल तर रहिवासाची स्थिती अनिवासी झाल्यानंतर सुद्धा ते खातं सुरु ठेऊ शकतात.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee