the psychology of money book in Marathi – पैशाचे मानसशास्त्र
- लेखक: मॉर्गन होऊजेल (Morgan Housel)
- अनुवाद – श्री. जयंत कुलकर्णी
- प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
- एकूण पाने : 275
- किंमत : Rs. 215
“पैशाचे मानसशास्त्र” (The Psychology of Money) या पुस्तकाने प्रसिद्ध झाल्यापासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपल्या रोजच्या जीवनातील पण बहुतेक वेळेस आपण दुर्लक्ष करत असलेलया किंवा हवा त्या पद्धतीने शिकवलेल्या नसलेल्या एका महत्वाच्या विषयाला लेखक अगदी समर्थपणे आपल्यासमोर मांडला आहे.
तुमच्या पैशाचा वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंध नसतो. तो तुम्ही कसे वागत याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत धाड असते, विशेषतः हुशार लोकांना.
श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही.
कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय… अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल.
उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो – दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. – तुमची प्रकृती आणि पैसा.तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे – गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे.
पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्टीमधें गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहीत वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते.
पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते, जेवताना, बैठक चालू असतांना निर्णय घेतात… जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री असा अनेक बाबी त्या निर्णयाप्रत अप्रत्यक्षपणें भाग घेत असतात.
पैशाचे मानसशास्त्र / The Psychology of Money By Morgan Housel
पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैश्याबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ हॉष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक सहा “पैसा” या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत.

गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.
चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही.
“हाऊजेलच्या निरीक्षणात दोन गोष्टीं आढळतात : पूर्वी जे सांगितले गेले नव्हते ते तो सांगतोय आणि त्यात तथ्यही आहे”
– हॉवर्ड मार्क्स (ओक ट्री कॅपिटल मॅनेजमेंट कंपनीचा संस्थापक)