पुस्तक समीक्षा – चाणक्याचा मंत्र (Chanakyas Chant)

chanalys-mantra-books

चाणक्याचा मंत्र (Chanakyas Chant)

  • लेखक : अश्विन संघी
  • अनुवाद : उमा पत्की
  • प्रकाशक : साकेत प्रकाशन
  • एकूण पाने : 400
  • किंमत: ₹ 346.00

इ.स. पूर्व ३४० साली आपल्या प्रिय पित्याच्या निघृण हत्येचा सूड उगवण्याची प्रतिज्ञा केलेला एक दुखावलेला अन् झपाटलेला ब्राह्मण युवक.

चाणक्याचा मंत्र

चाणक्याचा मंत्र
चाणक्याचा मंत्र

अत्यंत थंड, हिशेबी, क्रूर आणि सर्वमान्य नैतिक तत्त्वे संपूर्णतया झुगारून देणारा असा तो; भारतातला सर्वशक्तिमान, राजकीय डावपेच आखण्यात तज्ज्ञ बनतो आणि महान आणि देवावर हक्क सांगणाऱ्या अलेक्झांडरच्या सैन्याच्या आक्रमणाच्या विरोधात विभागलेला देश एकत्र आणण्यात यशस्वी ठरतो.

दोन सैन्यांमधल्या कमकुवत फळ्या एकमेकांविरुद्ध उभ्या करून तो अनीतिमान; पण आश्चर्यकारक विजय मिळवून शक्तिशाली मौर्य साम्राज्याच्या सिंहासनपदी यशस्वीरीत्या चंद्रगुप्ताची स्थापना करतो. इतिहासात तो बुद्धिमान डावपेचतज्ज्ञ चाणक्य म्हणून ओळखला जातो.

समाधानी; पण स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या अगदी साधा डावपेच खेळून राजगादी हस्तगत करण्यात यशस्वी ठरल्याने किंचित कंटाळलेला, असा तो, थोडे प्रसिद्धिपराङ्मुख होऊन त्याचे ‘अर्थशास्त्र’ हे संपत्तीविषयीचे शास्त्र लिहितो.

इतिहासाची पुनरावृत्ती होते या नियमानुसार जणू अडीच हजार वर्षांनंतर चाणक्य, गंगासागर मिश्रा नामक ब्राह्मण शिक्षकाच्या अवतारात भारतातल्या एका छोट्याशा गावात पुनर्जन्म घेतो. मिश्रा हे अनेक महत्त्वाकांक्षी लोकांना कठपुतळीप्रमाणे नाचवतात- त्यातच एक झोपडपट्टीतली छोटी मुलगी असते जी मोठी होऊन सुंदर आणि सर्वशक्तिमान स्त्री बनते.

आधुनिक भारत हा वर्गद्वेष, लाचलुचपत आणि दुफळी माजवणाऱ्या राजकारणामुळे जणू पुरातन भारताप्रमाणेच फुटलेला असतो – आणि याच पार्श्वभूमीवर गंगासागर संचार करतात. हा धूर्त ब्राह्मण – जो अनिर्बंधरीत्या हाव, लाच देण्याघेण्याची वृत्ती, वैषयिक नित्यनियमांपासून फारकत घेणे असल्या बाबींचा वापर करून एकत्र भारताचे स्वप्न पुन्हा प्रत्यक्षात आणू शकेल का?

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

साभार : साकेत प्रकाशन वेबसाइटवरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee