रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)
- लेखक : रॉबर्ट कियोसाकी
- अनुवाद : अभिजित थिटे
- प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं, यांची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांनां खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हांला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, या दिशेनेच शिकवत असतात. यातून हुशार विद्यार्थी चांगले गुण मिळवून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवतात, चांगली कारकीर्द घडवतात, समाजाच्या द्रुष्टीने यशस्वी दिसतातं – पण मग त्यांना सुद्धा आर्थिक विवंचना किंवा अचानक कोसळणाऱ्या संकटांमुळे आर्थिक आघाडीवर खचून जायला का होतं ? मग आपण यांना खरंच आर्थिक बाजूवर स्वतंत्र आणि श्रीमंत म्हणावं का?
लेखक या पुस्तकाच्या माध्यमातून त्याच्या जीवनाला दिशा देऊ पाहणाऱ्या दोन मार्गदर्शकांना “रिच डॅड ” आणि “पुअर डॅड” या नावानी संबोधतो. या दोघांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात एक सारख्या परिस्थितीतून केली. “पुअर डॅड” यांनी आपल्या नजरेत पी.एच. डी धारक उच्चशिक्षित, बुद्धिमान पण आर्थिक आघाडीवर फारसे सक्षम होण्यासाठी सर्वथा नोकरीवर अवलंबून असणारे. याउलट “रिच डॅड” हे अगदीच प्राथमिक शिक्षण घेतलेले पण भक्कम आर्थिक समज असणारे आणि व्यावसायिक, आर्थिक द्रुष्ट्या भक्कम, इतरांना रोजगार देणारे.
रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)
“रिच डॅड ” आणि “पुअर डॅड” दोघंही समाजामध्ये आदर असणारे, प्रभावी, खंबीर स्वभावाचे आणि अनुभवी. मग दोघांच्या आर्थिक बाजू इतक्या भिन्न कश्या? दोघांचा शिक्षणावर विश्वास पण फरक होता तो अभ्यासक्रमांमध्ये…!
दोघांनी आपल्या जीवनाच्या अभ्यासक्रमातून एक दृष्टिकोन विकसित केला – एक गरीब माणसाचा आणि दुसरा श्रीमंत माणसाचा. यांपैकी कुठलाही दृष्टिकोन चुकीचा नव्हता पण त्यातून पैशाबाबत बनलेली मतं परस्पर विरुद्ध होती – आणि हेच कारण होतं त्यां दोघांच्या अर्थी परिस्थितीमध्ये.
पुअर डॅड आपल्या मुलाला चांगला शिकून, चांगली नोकरी पटकावण्यासाठी प्रोत्साहित करतात जेणेकरून त्याच पुढील आयुष्य आरामात व्यतीत करता येईल. यांचा सल्ला म्हणजे – “आपण पैश्यासाठी काम करतो.”
याउलट रिच डॅड सुद्धा शिकण्यासाठीच प्रोत्साहित करतात पण त्या शिक्षणाचा उघड्या डोळ्यांनी करून संपत्ती निर्माण करण्यासाठी, जेन करून हीच संपत्ती अजून संपत्ती निर्माण करेल आणि उत्तरोत्तर ती वाढत राहील. यांचा सल्ला म्हणजे – “श्रीमंत पैश्यासाठी काम करत नाही, तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. पैसाच पैश्याला ओढतो आणि वाढवतो म्हणून संपत्ती निर्माण करा.”
सामान्य मनुष्य इमानदारीने नोकरी करतो, भरपूर कर भरतो, आपल्या गरजांसाठी कर्ज काढतो आणि त्याचं व्याज भरत राहतो. आयुष्याच्या संध्याकाळी आरामात रिटायरमेंट घेता येईल हेच चक्र आयुधभार करत राहतो आणि एका – रॅट रेस मध्ये अडकून जातो.
याउलट व्यवसायी मनुष्य उद्योग उभारतो, संपत्ती निर्माण करतो. या संपत्तीतून आलेला पैसे जास्तीच्या संपत्तीसाठी पुनः गुंतवतो आणि उत्तरोत्तर अधिक श्रीमंत होत जातो.
रिच डॅड पुअर डॅड – यांचा पैसे खर्च करण्याचा मार्ग
जीवनाच्या या रॅट रेस मध्ये अडकून न जाता आपलं जीवन आर्थिकदृष्ट्या संपन्न कसं करावं हाच मुख्य विषय घेऊन रॉबर्ट कियोसाकी यांनी हे जगप्रसिद्ध पुस्तकं लिहिलंय.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.