पुस्तक समीक्षा – सुखाचा शोध (Sukhacha Shodh)

sukhacha-shodh

पुस्तक समीक्षा – सुखाचा शोध (Sukhacha Shodh)

“मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वतःचे सुख
आणि विकास हि या संगमात पहिली नदी. कुटुंबाचे ऋण फेडणे त्यातला
दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाच्या प्रगतीला हातभार
लावणे हि या संगमात गुप्त सरस्वती.”

व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋण आणि समाजऋण हि तीनही सर्वमान्य
माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले
असे म्हणता येईल.

मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी
‘सुखाचा शोध’ या कादंबरीतून मांडले आहे.

‘त्यागातच सुख असते’ हि परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा ‘आनंद’,
एकावरच संसाराचे ओझे लढणारी ‘आप्पा आणि भय्या’ हि कर्तृत्वहीन
माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित ‘माणिक’
आणि भावनातिरेक व भावनाशुन्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त
असलेली ‘उषा’.

हि सर्व पात्रे हेच सांगतात कि, ‘परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे
व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते.’
‘मानवी मूल्याच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे, परंतु त्याग कधीही
कुपात्री होता काम नये.
१९३९ साली मांडलेले हे विषारी आजच्या समाजालाही उपयुक्त ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee