संत तुकारामांचा कार्य
संत अवतार असला तुकारामाच्या नशिबी प्रापंचिक भोग होतेच.
अगदी १७-१८ वर्षांचे असतांना त्याच्या आह वडिलांचा मृत्य झाला आणि नशिबी आलेलया या आघाताने त्यांचा आधीपासूनच जीवनात विरक्त असलेला मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला. सलग पडणाऱ्या दुष्काळामुळं त्याचा व्यवसाय बुडत होता, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली आणि संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला.
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।।
अनुतापें तुझे राहिले चिंतन । झाला हा वमन संवसार ।।
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ।।
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ।।
बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ।।
– श्री संत तुकाराम
एकामागून एक होणाऱ्या या दुःखातून त्यांचं आधीच हळवं असलेलं मन हे अधिकच हळवं झालं आणि भगवान विठ्ठलावर असणारी भक्ती अजूनच गाढ झाली. देहू गावाजवळ असलेल्या भंडारा डोंगरावर त्यांनी नित्यनेमानं भक्ती आणि उपासना सुरु केली. ह्याच भंडारा डोंगरावर त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला आहि मान्यता आहे.
तुकारामांनी मुखवटे अभंग रचनेची सुरवात केल्यानंतर त्यांच्या अध्यात्मिक अधिकारांची जाणीव घेऊन लोक त्याचं शिष्यत्व घेऊ लागले आणि त्यांतुनच त्याच्या बालमित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
प्रत्येक सत्पुरुषाला असतात तश्याच देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला पण तुकारामांचा आध्यात्मिक अधिकाराची प्रचिती आल्यानंतर ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.