श्री संत तुकाराम महाराज Sant Tukaram Maharaj Information in Marathi

Sant-Tukaram-Maharaj-history-in-marathi

भारताला आणि आपल्या मायभूमी महाराष्ट्राला एक समृद्ध संत परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी संतांनी दिलेलं योगदान हे सर्वोच आहे.

Sant Tukaram Maharaj Information in Marathi

महाराष्ट्रातल्या या थोर संत परंपरेतल्या “जगद्‌गुरू” म्हणून मानल्या गेलेल्या श्री संत तुकाराम यांचा जीवनपरिचय.

श्री संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj Information in Marathi ) महत्व इतकं कि प्रत्येक वारकरी प्रवचन व कीर्तनाचा समारोप “पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय” या जयघोषाशिवाय अपूर्णच आहे.

श्री संत तुकारामांनी आपल्या निर्भीड, वास्तववादी अभंगांनी तत्कालीन समाजव्यवस्तेवर, अंधश्रद्धांवर अचूक प्रहार केलेत. श्री संत तुकारामांची निर्मिती असलेले हे अभंग कविता आज सुद्धा तितक्याच लागू होतात.

श्री संत तुकाराम महाराज जन्म आणि कार्य (Sant Tukaram Maharaj Information in Marathi)

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या समतावादी संत कवी श्री संत तुकारामांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात देहु या गावात सन 22 जानेवारी 1608 वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकाराम महाराजांचे वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. तर आईचे नाव कनकाई असे होते.

श्री संत तुकाराम क्षत्रिय मराठा समाजात जन्माला आले होते असे असले तरी ते स्वतःला शूद्र , कुणबी, यातीहिन समजत. अर्थात संत तुकारामांचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. 

संत तुकारामांचा परिवार | Sant tukaram family

संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे संत ज्ञानेश्वर कालीन महान साधू होते. विश्वंभर बाबांनी संत तुकारामांच्या कुळामध्ये विठ्ठल भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असे म्हणता येईल. संत तुकाराम महाराजांचे कुटुंब हे विठ्ठल भक्त होते. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती.

संत तुकाराम यांचे लग्न त्यांच्या वडिलांनी रुक्मिणीशी लावून दिले. रुक्मिणी किंवा रूखमाई ही तुकाराम महाराजांची पहिली पत्नी पुढे दम्यामुळे अकाली मृत्यु पावली. तिचा पहिला मुलगा सुद्धा अकाली मृत्यू पावला. या दुःखाने तुकाराम महाराज व्याकुळ झाले.

तुकाराम महाराज यांचे दुसरे लग्न जिजाईशी झाले. जिजाईचे नाव अवलाई असेही होते. जिजाईपासून संत तुकारामांना महादेव, विठोबा, नारायण आणि काशी. भागीरथी. गंगा अशी सहा मले झाली.  अवलाई स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली.

श्री संत तुकारामांना साक्षात्कारी संत कवी म्हणतात. श्री संत तुकारामांनी संस्कृत आणि क्लिष्ट भाषेत असलेल्या वेद -पुराणांनाचं तत्वज्ञान आपली अभंगांतून सामान्यांच्या बोलीभाषेत आणलं. ह्या अभंगांची रसिकता आणि गोडवा इतका कि आज शेकडो वर्षं झाल्यानंतर सुद्धा जगातील साहित्यिक, अभ्यासक तितक्याचं आदराने आणि प्रेमके त्याचा अभ्यास करतात.

साध्वी बहिणाबाई आपल्या एक अभंगात तुकारामांना भागवत धर्माचा कळस म्हणतात ते असे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, ………… तुका झालासे कळस’. तुमरामांच्या प्रत्येक अभंगात एक मंत्राचे सामर्थ्य आहे. खेडोपाड्यातला अगदी अशिक्षित असलेला व्यक्ती सुद्धा तुकारामांच्याअभंग आणि गवळणी अगदी तोंडपाठ आहे.

तुकाराम गाथा इंद्रायणी नदींत बुडवली असतांना सर्वसामान्यांच्या हृदयातून आणी मुखातून तुकारामांचे अभंग गाथा आजही जिवंतआहे. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे.

बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये आणि तत्कालीन साजातल्या अनिष्ट रूढी आणि चालीरीतींवर प्रहार करण्यात ते यशस्वी ठरले आणि त्याचबरोबर लोकांनाआध्यात्मिक प्रवाहात आणण्याचें काम त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee