आर्थिक नियोजनासाठी 5 महत्त्वाचे नियम (5 Financial Planning thumb rules)
आपल्यापैकी प्रत्येकजण काही ना काही पैसे कमावतो पण आपल्याला माहित आहे का की आपल्यापैकी बरेच जण आपले पैसे योग्यरित्या व्यवस्थापित करत नाहीत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने खर्च केलेला प्रत्येक रुपया म्हणजे तुमचे पैसे वाया घालवण्याशिवाय काहीच नाही. आम्हाला पैसे कमवायला शिकवले जातं पण ते हुशारीने कसे व्यवस्थापित करायचे (वापरायचेत) ते नाही – आणि येथे आर्थिक नियोजन (Financial Planning) आम्हाला आमच्या कष्टाने कमावलेले पैसे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते, यामुळे आमचे स्वतःचे पैसे आपल्यासाठी काम करतात आणि वाढतात (Make our own money work for us and grow with time).
आर्थिक नियोजन किंवा फिनान्सियल प्लांनिंग म्हणजे काय(What is financial planning)?
समजा, “अ” आणि “ब” दोघे मित्र आहेत आणि त्याच्या पहिल्या जॉबच्या पहिल्या दिवाळीसाठी त्यांना नुकताच १०,००० रुपये बोनस मिळालाय. तर आता हे याचं याचं काय करणार? इथं भिन्न स्वभावाच्या आणि आवडनिवड असलेल्या लोकांचा विचार केला तर परिणाम (आणि परतावा) वेगवेगळाच मिळणार.
“अ“ला आवडतं छान राहणं, ब्रँडेड कपडे, नवनवीन गॅजेट्स वापरणं आणि त्यासाठी त्यानं थोडा अधिकचा खर्च लागला तरी चालेल कारण आपल्याला नोकरी आहे असं त्याला वाटतं. त्यामुळं यातील काही भाग तो बँकेत ठेऊन उरलेले पैसे तो स्वतः वर करण्याचं ठरवतो.
“ब“चा स्वभाव थोडा वेगळा आहे त्याला थोडी भविष्यासाठी चिंता आहे. त्याचा विचार करून तो हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो. त्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घेतो आणि आपल्या भविष्यात लागणाऱ्या गोष्टीचा विचार करून टर्म इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंडात हे पैसे गुंतवतो.
“अ” ला बँकेच्या ३-५% व्याजानुसार बाजूला ठेवलेल्या पैश्यावर काही रुपये वाढून मिळतील, याउलट “ब” ला मात्र त्यापेक्षा कितीतरी चांगला परतावा मिळेल. “ब” च्या पैश्यांची झालेली वाढ (मनी अँप्रेसिएशन) त्याला त्याच्या सध्याच्या गरजांसाठी उपयोगी पडू शकते.
लक्षात घ्या आपण हे एक प्रतीकात्मक उदाहरण पाहतोय. मुद्दा हा आहे कि “अ”चं फार मोठ्ठ नुकसान झालं नाही पण त्यानं योग्य ठिकाणी तो पैसा गुंतवला असता तर त्याचसुद्धा परतावा जास्त झाला असता.
तर परताव्यातील हा फरक कशामुळं आला – तर योग्य आर्थिक नियोजन न केल्या मुळे?
तुमचा मेहनतीने कमावलेला पैसा तुमच्या सध्याच्या कमाईचा विचार करून सद्य आणि भविष्यकालीन गरजांचा विचार करून योग्यपणे गुंतवणे, ज्यामुळं त्याची योग्य वाढ होईल, आणि हाच वाढलेला पैसा तुमच्या (महागाईमुळें किंमत वाढलेल्या) भविष्यातील गरजांसाठी तुम्हाला वापरता येईल – यासाठी योग्य ते नियोजन करणं यालाच आर्थिक नियोजन (Plan your finances) करणं असं म्हणतात.
5 Financial Planning thumb rules :
नियम 1 : स्वतःला प्राधान्य द्या (Pay youeself first)
पैसे आपण आपल्या आणि आपल्या परिवारासाठी कमावतो त्यामुळं कधीही स्वतःला स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःला प्राधान्य द्या याचा अर्थ फक्त स्वतःवर खर्च करा असा नाही तर कुठलंही लोन किंवा तत्सम गोष्ट घेतांना स्वतःचा खर्च आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही असं केलं नाही तर तुमचा पैसा तुमच्या गरजांसाठी उपयोगी न राहता लोन वगैरेची परत फेड करण्यातच खर्च होऊन जाईल.
गरजेपेक्षा अधिक खर्च, किंवा सारखे लोन घेऊन वस्तूंची खरेदी नेहमीच गरजेची नसते, आपण आपल्या अनावश्यक गरज वाढवल्यात तर नुकसान आपलाच आहे. लक्षात घ्या, बॅंकांचा तो व्यवसाय आहे कि तुम्हाला क्रेडिटकार्ड किंवा लोन देऊन पैसे कमावणे, त्याचा मुख्य गरजांसाठी वापर करणं आपल्याला अनिवार्य असू शकत पण छानचौकीसाठी नाही.
स्वतःची योग्य गरज ओळखा आणि आपला पैसे त्यासाठी प्राधान्यानं खर्च करा, इतरांसाठी नाही.
नियम २ : आपत्कालीन निधी बनवा (Build emergency fund)
आपल्याकडे आज पैसे आहेत किंवा कमाईच्या माध्यमातून ते नियमित येत आहेत असं नेहमीं असेलच असं नाही. नुकतंच आलेलं कोरोना संकट बघितलंच तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, किती तरी लोकांचा आरोग्याविषयीचा खर्च अचानक आवाक्याबाहेर गेल्या – अश्या संकटावेळी त्यांना कश्याची मदत झाली असेल तर ती त्यांनी केलेल्या बचतीची/गुंतवणुकीची. पण त्यांनी जर आपत्कालीन निधी
अश्या अचानकपणे उद्भवणाऱ्या मोठ्या खर्चाची तरतूद म्हणजे आपत्कालीन निधी. आपत्कालीन निधी आपल्या सध्याच्या मासिक खर्चाच्या साधारणपणे ६ ते ८ पट असला पाहिजे जेणेंकरून कुठल्या कारणानें जर मासिक कमाई बंद झाली तरी तुम्ही तुमची सध्याच्या गरज पुढील ६ महिने भागवू शकता, त्यासाठी तुम्हाला फारशी काटकसर करण्याची गरज नाही.
नियम ३ : पुरेसा जीवन विमा घ्या (Get enough life cover)
जीवन विमा म्हणजे आपल्या अनुपस्थितीत आपल्या कुटुंबासाठी केलेली आर्थिक सोय. आता हि सोय आपल्या व्यतिरिक्त असल्यानें पुरेशी असणं फार गरजेची आहे नाहीतर परिवारावर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. काही वर्षांपूर्वी जावं विम्याला आपल्याकडं एकाच पर्याय होता आणि तो म्हणजे – LIC, पण खरं तर त्यांच्या विम्याची रक्कम खरंच खूप कमी आहे.
आज आपल्याकडं “टर्म इंशुरन्स” (Term Insurance) म्हणून एक खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या सध्याच्या वयानुसार थोड्या किंमतीमध्ये तुम्ही चांगल्या किंमतीचा विमा उतरवू शकता. इथं तुम्हांला परताव्याची गुंतवणूक करायची नाहीं हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठलाही विमा आणि गुंतवणुकीचा संगम (e.g. ULIPs, or LIC) असलेल्या योजनांचा विचार करू नका.
नियम ४ : पुरेसा आरोग्य विमा घ्या (Get enough health cover)
आजच्या धकाधकीच्या आणि बऱ्याच प्रमाणांत चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारांच प्रमाण फारच वाढलंय. काही काळापूर्वी म्हातारपणी हमखास होणारे आजार आज कमी वय असलेल्यांमध्ये सुद्धा सहज आढळतात, त्यातच भरमसाठ वाढलेला आरोग्यसुविधांवरील आपलं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून जातं.
बाजारात आज बरेंच आरोग्य विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या सध्याच्या वयानुसार, फिटनेस नुसार तुम्हस्वतःसाठी आणि परिवारासाठी तुमच्या पालकांसाठी योग्य असा बेस प्लॅन घेऊ शकता आणि टॉप अप च्या माध्यमातून स्वस्त्तात ५ ते ६ पटीत विम्याची रक्कम वाढवून घेऊ शकता.
नियम ५ : विम्या आणि गुंतवणुक यांची कधीही सांगड घालू नका ( Do not mix insurance with investments)
विमा आणि गुंतवणूक यांची सांगड असलेल्या योजना हे एक फारसं चांगलं समीकरण नाही.
माहिती आहे का?
- तुमच्या सध्याच्या वयानुसार या योजनांमध्ये तुमच्या कडून मॉरटॅलीटी चार्ज घेतला जातो – ह्याला सोप्या भाषेत तुम्ही ते देत असलेल्या विम्याचा हप्ता म्हणू शकता जो तुमच्या योजनेच्या प्रीमियम मधून कापून घेतला जातो आणि उरलेली रक्कम तुमच्या खात्यात गुंतवली जाते.
- तुमच्या प्रीमियन मधून वेगवेगळे चार्जेस वसूल केले जातात जस की तुमचा पैसे व्यवस्थापित करण्याचा चार्ज, वार्षिक चार्ज, तुम्हाला पैसा एका फंडातून दुसऱ्या फंडात वर्गीकृत करायचा असेल तर त्याचा चार्ज. आता हे सगळे चार्जेस आपल्याला मागितले जात नाहीत पण तुमच्या फंडाच्या सध्याची किंमतीतून त्या ठराविक रकमेची युनिट्स विकून ते तुमच्या कडून वसूल केलें जातात. त्यामुळं तुमचे युनिट्स कमी होतात आणि दीर्घ गुंतवणुकीचे जे फायदे तुम्हाला सांगितलेलं असतात त्यावर कम्पाउंडिंग गणित तुम्ही मांडलं तर तुमचं थोडं जास्तीच नुकसान ठरतं.
- या योजनांमध्ये तुम्ही सुरुवातीचे ठराविक वेळेसाठी अडकून पडतात साधारणतः ५ वर्षांसाठी. तुम्हाला असं सांगितलं जात कि त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकतात. पण लक्षात घ्या सुरवातीचा हा लॉक इन पिरियड हा तुमचा गुंतवणुकीचा काळ असतो ज्यामध्ये फारसा चांगला परतावा कुठलीच योजना देत नाही, चांगल्या परताव्यासाठी तुम्हाला बरीच वर्ष गुंतवणूक ठेवावी लागते. आता परवावा चांगला दिसत नसल्याने बरीच लोकं पैसा यानंतर काढून घेतात आणि ज्या कम्पाउंडिंग रिटर्नसाठी तुम्ही गुंतवणूक केलेली असते ती सध्या होत नाही.
नियम ६ : म्हातारपणासाठीची तरतूद करा (Retirement Planning)
आता हे सर्वानाच माहीत आहे की कुठलीही नोकरी पेन्शन देत नाही अगदी सरकारी असली तरी. त्यामूळे आपल्या म्हातारपणासाठीची सोय आपली आपणच करायला हवी.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.
जीवनात आर्थिक नियोजन अतिशय महत्वाचे आहे, ते जर योग्य ठिकाणी व योग्य वेळी केले तर भविष्यात आर्थिक समस्यांना तोंड देण्याची आवश्यकता नाही. लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.
आर्थिक नियोजन महत्वाचं आहे. आज केलेली चुकीची गुंतवणुकीतून झालेलं नुकसान कदाचित भरून निघेल, पण गेलेली वेळ नाही. त्यामुळं आज वेळी केलेली गुंतवणूक हि भविष्यात चक्रवाढ पद्धतीने परतावा देऊन जाईल, त्यामुळं गुंतवणूक करतानाची वेळ महत्वाची.
Good job Vinod ! Every earn money but donot invest money proper way …..useful info for investers
धन्यवाद!!
खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावले आहे
धन्यवाद!!
Useful information vinod.. investment is important and it should be done in right way on right things..
Very good Vinod!