आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करतो (how you destroy your financial health)

piggy-bank

आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करतो (how you destroy your financial health)

प्रत्येकजण आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाच्या कौशल्यानुसार पैसा कमावतो पण अधिक शिक्षित असलेली व्यक्ती आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवू शकेल किंवा तिचा योग्य विनोयोग करेलच याशी काहीही शास्वती नाही आणि फक्त एकच – अर्थसाक्षरता नसणे.

आपलं आपल्या आजुबाजुला अनेक उच्चशिक्षित, आपल्या नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर झालेली लोक पाहतो पण बऱ्याच वेळेला ते आर्थिक घडी नीट बसवू शकत नाही, अकस्मात आलेल्या आर्थिक गरजच सामना करण्यात त्यांना अडचण येते याच कारण असतं ते त्यांनी आपलं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केलं नाहीये.

लक्षात घ्या आपण कितीही अर्थसाक्षर झालोत तरी आपल्याला एक परिपुर्ण आर्थिक जीवन जगन कठीण आहे कारण गुंतवणुकीच्या बाबतीत अनेक गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात पण एक चिंतामुक्त राहता येईल असं आर्थिक कवच बनवायचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.

याचसाठी या लेखात आपण पाहणार आहोत केल्यानं आपण आर्थिक अडचणींमध्ये येऊ शकतो आणि ते कसं टाळावं. आपल्यापैकी बहुतेक लोक या चुका करतात आणि स्वतःला आर्थिक अडचणीत टाकतात अश्याच काही गोष्टी –

1. टर्म इन्शुरन्सला खर्च समजणं / Avoiding Term Insurance

भारतात जर कुठलं आर्थिक उत्पादन चुकीच्या पद्धतीने विकलं जात असेल तर ते म्हणजे इन्शुरन्स. सुरवातीच्या काळांत इन्शुरन्स म्हणजे फक्त एल.आय.सी. हेच होत पण यामध्ये खाजगी आस्थापनांना परवानगी दिल्यानंतर प्रत्येक गुंतवणूक म्हणून इन्शुरन्स आणि युलिप प्लॅन ग्राहकांना विकले जाऊ लागलेत.

याच इन्शुरन्सला एक प्रकार आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरंसला खर्च समजून त्याला टाळणारे बरेच आहेत पण लक्षात घ्या टर्म इन्शुरंस हा परताव्याच्या उद्देशानें घेतलेला नसतो.

साध्या इन्शुरन्समध्ये आपल्याला जोखीम आणि गुंतवणूक दोन्ही मिळतात पण त्यात असणार गुंतवणुकीच प्रमाण जास्त आणि इन्शुरन्सच कमी असत. म्हणजे आपण काही हजार भरून मोजका इन्शुरन्स मिळवतो आणि बराचसा भाग कमी परतावा असलेल्या गुंतवणुकीत टाकतो.

टर्म इन्शुरन्स पूर्णतः इन्शुरन्स उत्पादन आहे यात तुम्हांला मुदतपूर्ती नंतर कुठलाही परतावा मिळत नाही पण कमी खर्चात तुम्हांला बरीच मोठी रक्कम विम्याची रक्कम म्हणून सुरक्षित करते. दुर्दैवाने जर टर्म धारकाला जर नाही झालाच तर ती मोठी रक्कम त्याच्या पश्च्यात त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवायला मदत करू शकते.

तेव्हा शक्य तितक्या लवकर आरोग्य चांगलं असतांना टर्म प्लॅन घेण्याचा प्रयत्न करा तो आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी उत्तम पर्याय आहे.

2. कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्सवर अवलंबून असणे / Get Enough Health Cover

आरोग्यावर येणाऱ्या खर्चाचा विचार केला तर हा खर्च अकस्मात येणाऱ्या प्रकारात मोडतो, यावर खर्च होणारी रक्कम सुद्धा खूप जास्त असू शकते आणि अश्या परिस्तितीमध्ये जस आपण आपल्या कंपनीतर्फे मिळणाऱ्या तुटपुंज्या हेअल्थ इंशुरन्सवरती अवलंबुन राहणार असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात.

how you destroy your financial health

कुठल्याही कंपनीतर्फे साधारण २ ते ४ लाखांदरम्यान कर्मचारी हेल्थ कव्हर दिलं जात. आज कुठलाही छोट्या आजारासाठी आपण दवाखान्याला भेट दिली तरी हजार रुपये सहज मोडतात मग मोठ्या आजारांविषयी विचार करून पहा- ती छोटी रक्कम आपल्याला खरंच पुरणार आहे का?

बार या ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमध्ये फक्त कर्मचारी आणि त्यांचे बायका मुलं ग्राह्य धरली जातात, तुमच्या घरातील वयस्कर व्यक्ती जसं आई-वडील यांच्यासाठी तुम्हांला वेगळे पैसे भरून हेल्थ कव्हर घ्याव लागतं – खरतर वयोपरत्वे याची जास्त गरज यांनाच असते.

नुकताच आपल्याला कोरोनाच्या दरम्यात याचा अनुभव आलेलाच आहे. कित्येकांची आर्थिक घडी पुरेसं हेल्थ कव्हर नसल्यामुळं पार विस्कटून गेली आहे आणि हे फक्त एक नुकसान कंसात तर आपण आपल्या आर्थिक जीवनात काही वर्षे मग लोटले जातो.

3. क्रेडिट कार्ड किंवा छोट्या कर्जाचा वापर / Don’t overuse Credit Cards

क्रेडिट कार्ड मिळवणं आता बऱ्यापैकी सोपं झालय आणि त्याचा वापर करायला आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या चिक्कार ऑफर्सचा दिवसभर आपल्यावर भडीमार होत असतो. डिस्काउंट, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स याची आपल्याला इतकी सवय झालीये की त्या थोड्या प्रलोभनांसाठी आपण साजन खर्च करायला तयार होतो.

आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करावे

लक्षात घ्या क्रेडिटकार्डतर्फे केलेली खरेदी हे एक थोड्या कालावधीसाठीच कर्जच आहे, तुम्ही वेळोवेळी त्याचा भरणा करून ते बंद करत असत तोवर चांगलं पण तुम्ही फक्त कमीतकमी रक्कम भरून वेळ मारून नेत असाल तर ते तुम्हाला गोत्यात आणल्याशिवार राहणारं नाही. मुळात कुठल्याही क्रेडिटकार्डाचा व्याजाचा दर पहिला तर धडकी भरू शकते जो साधारण १८-३२ टक्क्यांपर्यंत असू शकतो.

क्रेडिट कार्ड देणाऱ्याचा मुळ उद्देशच तो असतो कि तुम्ही त्याचा यथेच्छ वापर करावा आणि पूर्ण पैसे कधीही भरू नये जेणेकरून ते तुमच्याकडून भरपूर व्याज वसूल करू शकतील. तुम्ही वेळोवेळी क्रेडिट वापरून खरेदी करत असाल आणि पैसे सुद्धा भरत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहील पण अश्या ग्राहकांपासून बँकांना काहीही फायदा नसतो – आपण त्यांच्या साठी कमाई न करून देणार साधन ठरतो.

एकापेक्षा जास्त क्रेडिटकार्ड बाळगणं सुद्धा थोडं धोकादायकच आहे, तुम्ही एकाचे पैसे दुसऱ्या कार्डातून देत असाल पण या गोष्टी नेहमी तुमच्या कमाईच्या दृष्टीनें आवाक्यात राहतील याची खात्री करा नाहीतर तुम्हाला आर्थिक शिस्त ना पाळण्याचा परिणाम पाहावा लागू शकतो.

4. दिखावा करण्यासाठी जास्त खर्च करणं / Do Not Show off On Finances

भारतातील सर्वात स्वस्त आणि कमी खर्चात झालेलं लग्न माहितीये कुठलंय – अंबानींच्या मुलीचं. अंबानी कुटुंबाने त्यांच्या लाडक्या मुलीच्या लग्नात अंदाजे १००-११० मिलियन्स खर्च केलेत आणि त्याच्या एकूण संपत्तीच्या मानानं हे विशेष नाही. हा एक खरंच मोठा आहे आकडा आहे मग तुम्ही म्हणाल हे लग्न कमी खर्चात झालय ते कसं? तर,सरासरी भारतीय आपल्या जीवनात कमावलेल्या एक पंचमांश रकमेची उधळपट्टी लग्नात करतो म्हणजे अंबानींने इतका मोठा खर्च करून सुद्धा त्यांचा लग्नाचा खर्च आपल्यापेक्षा कमीच नाही का?

यासारखंच दिखाव्यासाठी नवनवीन येणार फोन्स दर थोड्या कालावधीने बदलत राहणं, नेहमी हॉटेलमध्ये जेवण, ब्रँडेड कपड्यांचा बडेजाव ह्या पैसा आपल्याहारुन खेचू नेणाऱ्या गोष्टी आहे यांचा अतिरेक बरोबर नाही – आता या गोष्टींची खरंच काही अपरिहार्यता असेल तर त्याचा खर्च केला पाहिजे पण उगाच यावर सतत पैसा उधळणं हि पैश्याची नासाडीच मानली पाहिजे.

5. तुमच्या गुंतवणुकीवरील सोशल मीडियाचा प्रभाव / Avoid Social Media Influence Investment Decisions

तुमची गुंतवणूक तुम्ही कुठल्या माहितीच्या प्रभावाखाली येऊन केलीये का? विचारायचा कारण असं कि गेल्या काही काळापासून जेव्हापासून आपण कोरोना काळात घरात बंद झालो होतो अचानक शेअरमार्केट मधल्या गुंतवणुकीत ओघ आला, कधीनव्हे इतके नवीन डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट्स उघडले गेलेत आणि लोकांनी मुक्त हस्ताने त्यात पैसे ओतायला पण सुरवात केली. नैसर्गिकपणे बहेतुकानं भरपूर नुकसान झालं कारण त्यांनी केलेली गुंतवणूक हि कुठल्या अभ्यासानुसार नव्हे तर सोहळ मीडियावर जसा खोटा प्रचार केला गेला होता त्याला भुलून केली गेलेली होती.

आम्ही किती मोठा प्रॉफिट काही मिनिटांत काढतो याचे व्हिडीओ युट्युब, टेलिग्राम वर चिक्कार फिरत होते, मग त्यासाठी आमचं सुब्स्क्रिप्शन घेऊन टिप्स घ्या आणि पैसा कमवा छापाच्या सर्व्हिसेस सुरु झाल्यात आणि अनेकांची इतर काही काम नसल्यामुळं आणि मुख्य म्हणजे अश्या झटपट पैसा मिळवून देण्याऱ्या गोष्टींचा लोभ झाल्यानं बराच नुकसान सहन केलं.

या गोष्टीसारखं जसा लोभ, झटपण पैसा मिळवण्याची वृत्ती आणि मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा अतीरेकी प्रभाव कारणीभुत आहे.

गुंतवणुकीच थोडं औषधासारखं असतं. दोन रुग्णांना सारखा आजार असेल तर डॉक्टर त्यांना सारखंच औषध देईल असं नाही. त्यांची शारीरिक क्षमता, ऍलर्जी, इतर लक्षण वगैरेंचा विचार करून त्याला तो उपयोगी ठरतील अशीच वेगवेगळी औषध देणार. गुंतवणुकीचा पण असंच आहे, तुमची सध्याची आर्थिक स्थिती, सध्याच्या गरजा, भविष्यकाळी गरजांचा विचार आणि मुख्य म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करून जर आपण गुंतवणूक केली तरच ती फायदेशीर ठरू शकते.

चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणुक तुम्हाला फायद्यापेक्षा नुकसानदायकचं ठरेल – तेव्हा कुठलीही गुंतवणूक करताना स्वतः अर्थसकंधार व्हा, तिची गरज आणि परिणामकारकता तुमच्या गरजांच्या अनुरूप असेल याची खात्री करून घ्या आणि हे जमत नसेल तर पैसे भरून योग्य असा आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

6. गुंतवणुकीचा मोफत सल्ला टाळा /Avoid Free Investment Advice

याबद्दल अधिक काय सांगायचं. मोफत सल्ला देणारे भरपूरजणं भेटतील पण त्यांनी दिलेला सल्ला नेहमी बरोबरच असेल असं नाही. तूम्हाला मिळालेले मोफत सल्ले देणाऱ्याची आर्थिक स्थिती पण नजरेखालुन घाला – ते आपल्या जीवनात आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, स्वावलंबी आहेत का हे तपासा.

समजा तुम्ही १,००,००० ची गुंतवणुकीची संधी शोधात आहात तर तुम्ही एल.आय.सी. एजेंट जा कुठली एल.आय.सी. पॉलिसी घेण्याचा सल्ला देईल. तुम्ही बँकेत चौकशी केली तर तर तो तुम्हांला मुदत ठेव किंवा युनिट लिंकेड प्लॅन वगैरे घेण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, याना यांची टार्गेट्स पूर्ण करायची असतात म्हणून त्यांना अनुरूप असलेला सल्ला तुम्हाला मिळेल तुमच्या गरजांचा अनुरूप असेलला नाही.

तेव्हा मोफत मिळालेला सल्ला काळजीपूर्वक तपासा पण गुंतवणुकीचा निर्णय मात्र थोडा स्वरथु बनूनच घ्या, शेवटी तुमचा पैसा हा तुमच्या कमी आला पाहिजे इतरांच्या कमीशनसाठी नाही.

6. आर्थिक आघाडीवर DIY वृत्ती टाळा / Avoid Let Me Do Approach on Investments

कोरोना काळापासून म्हणा किंवा व्हाट्सअप युनिव्हर्सिटी सुरु झाल्यापासून आजकाल प्रत्येकाला सगळ्याच गोष्टीं कळतात. कुठलीही हवी असलेली माहिती गुगल क्षणांत आपल्याला मिळवून देतो आणि मग आपण Do It Yourself (DIY) वापरून त्याबाबतींत स्वावलंबी असल्याच्या अविर्भावात तो गोष्ट स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो – आणि आर्थिक शिस्तीत हे बसत नाही.

इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्वच माहिती हि परिपुर्ण असेल याची खात्री कुणी देत नाही, तसेच ती शेवटची कधी अद्ययावत केली गेलीये हे पण आपण बऱ्याचवेळेस ठरवू शकत नाही आणि अश्या अपूर्ण माहितीच्या आधारे जर आपण गुंतवणूक किंवा मेहनतीने कमावलेल्या पैशाबाबत निर्णय घेणार असू तर ते नक्कीच सुरक्षीत असणार नाही.

युट्युब किंवा अश्याच इतर व्यासपीठांवरती अश्या माहितीचं दुकान मांडलेले बरेच कॉन्टेन्टस आपल्याला मिळतात पण त्यांनी कुठल्या स्तोत्रांमार्फत हि माहिती बनवलीय, त्यांचा त्याविषयीचा खरंच अधिकार, शिक्षण आणि माहिती किती आहे हे बऱ्याचदा स्पष्ट नसतं – मग अश्या वेळेस आपण ह्यांना टाळलेच बार.

उदारणार्थ, तुम्ही कितीही चांगले डॉक्टर असाल आणि स्वतःच्या नवीन दवाखान्यासाठीच बांधकामाचं काम स्वतःच करायचं ठरवलं तर ते जमेल कसं? त्यासाठी तुम्हांला कुणी सिव्हिल आर्किटेक्ट्च मदत करू शकेल. तेव्हा ज्याचं काम त्यानं करावं या सध्या नियमाला अनुसरून आपण स्वतःच आर्थिक स्वयंपूर्णतेचे निर्णय स्वतः घेऊ शकत नसू तर थोडे पैसे देऊन योग्य असा व्यावसायिक स्वल्लागार निवडा – तो तुमची आर्थिक घडी योग्य पद्धतीने बसवू शकतो.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee