एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे ५ फायदे (5 Benefits of having multiple savings accounts)

5-Benefits-of-having-multiple-savings-accounts

एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे ५ फायदे (5 Benefits of having multiple savings accounts)

बचत खातं हे अतिरिक्त पैसे बाजूला टाकण्यासाठी आणि प्राथमिक गुंतवणुकीसाठी एक सर्वमान्य मार्ग आहे. एक चांगले बचत खाते तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि व्याज देते, ज्यामुळे तुमची शिल्लक वेळोवेळी वाढू शकते.

अनेक लोक असे गृहीत धरतात की त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे फक्त एक बचत खाते असणे आवश्यक आहे, परंतु निव्वळ एकच बचत असणं नेहमीच योग्य असेल असं नाही.

सध्या नक्की किती बचत खाते असावीत असा ठराविक नियम नाही पण आपण आपल्या गरजेनुसार एकापेक्षा जास्त बचत खाती उघडु शकतो. एकापेक्षा जास्त खाती बाळगल्यास त्याचा तुमच्या क्रेडिट रेटिंग्जवर सरळ सरळ परिणाम होत नाही.

5 Benefits of having multiple savings accounts

विशिष्ट उद्देश ठेऊन तुम्ही जर योग्य बचत खाती निवडली असतील तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल.

प्रत्येक बँक खातेधारकाने त्यांचे पॅनकार्ड आणि आहात आयकर विभागाशी लिंक करणे अनिवार्य आहे – त्यामुळे कोणाचेही खाते आणि कोणताही व्यवहार आता ट्रॅक करण्यापासून लपवणे खरोखरच अशक्य आहे.

तुमच्याकडे फक्त एक बचत खाते असल्यास तुमच्या बँक खात्यांचा मागोवा ठेवणे सोपे आहे. तुमचा टॅक्स योग्य पद्धतीने भरण्यासाठी तुम्हाला चालू वर्षात झालेला फायदा, जमा झालेले व्याज, डिवीडेंट इत्यादी सर्व काही एकाच खात्यांत असतील तर त्या के स्टेटमेन्टमधून हवी ती माहिती काढणं तुम्हाला सोपं जाईल. तसेच तुमच्या बॅंकेच्या डेबिटकार्ड, मासिक किंवा त्रैमासिक कमीतकमी बॅलन्सची गरज आणि असेच इतर चार्जेस हे तुम्हाला फक्त एकाच खात्यासाठी भरावे लागतील आणि तुमची थोडी जास्त बचत होऊ शकेल.

एकापेक्षा जास्त बचत खाते कधी उघडायचे? (When to open more than one savings bank account)

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला एकापेक्षा जास्त बचत खाती चालवणं शक्य होत नाही, पण ज्यांना हे शक्य आहे त्यांनी स्वतःच आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी खालीलप्रकारे एकापेक्षा जास्त खाती बनवू शकतात –

वैयक्तिक बँक खाते (Individual Savings Account)

तुमच्याकडे एक प्राथमिक वैयक्तिक बचत खात असणं गरजेचं आहे. या बचतखात्याचा वापर तुम्ही तुमचे सर्व EMI पेमेंट, भाडे, म्युच्युअल फंड गुंतवणूक, मासिक खरेदी आणि इतर स्वयंचलित बिल पेमेंटशी लिंक करू शकतात. तुमच्याकडे पगाराव्यतिरिक्त येणार कुठलाही पैसे सरळ या खात्यांत स्वीकारल्यास वर्षाशेवटी कर भरण्यासाठी तुम्ही सर्व माहिती या एकाच खात्यात मिळेल आणि हे तुम्हाला थोडं सोपं पडेल.

पगार बँक खाते (Salary Account)

सामान्यतः पगार खाती (Salary accounts) ही शून्य शिल्लक खाती (zero balance) असतात, तुम्हाला त्यात कोणताही निधी ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे, तुमचा पगार त्यात जमा झाल्यानंतर तुम्ही तुमचा मासिक खर्च, गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेला निधी तुमच्या वैयक्तिक बचत खात्यांमध्ये हलवू शकता.

गुंतवणूक आणि खर्च भागवण्यासाठी तुम्ही नियमितपणे या खात्यातून तुमच्या मुख्य वैयक्तिक बचत खात्यात विशिष्ट रक्कम हस्तांतरित करू शकता.

साधारणपणे, तुम्हाला बहुतेक पगार खात्यांवर खालील वैशिष्ट्यांचा लाभ (salary account benefits) मिळतात, हे तुमच्या वर्तमान बँकेनुसार बदलू शकते. तुमच्या बँकेच्या नियमानुसार वैयक्तिक बचत खाते तुम्हाला या फायद्यांसाठी शुल्क भरावे लागेल.

  • शून्य शिल्लक खाते. (Zero balance account)
  • लॉकर सुविधा (Locker Facility)
  • कोणतेही मासिक सरासरी शिल्लक शुल्क नाही. (No Monthly Average Balance)
  • कर्मचारी प्रतिपूर्ती खाते (Employee Reimbursement Account)
  • ऑटो स्वीप सुविधा (Auto Sweep facility)
  • अनन्य लाभांसह आजीवन मोफत डेबिट कार्ड (Lifetime free debit card)
  • कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये मोफत अमर्यादित व्यवहार( Unlimited ATM transactions)
  • मोफत डिमांड ड्राफ्ट (Free Demand Draft)
  • मोफत मल्टी सिटी चेक (Free Multi City Cheque)
  • मोफत डी-मॅट खाते (Free D-mat & Trading account)
  • विनामूल्य किंवा कमी शुल्क क्रेडिट कार्ड (Lifetime free or Lower fee credir card)

जोडीदारासह संयुक्त बँक खाते (Joint Account with Spouse)

परिवाराच्या सध्याच्या किंवा भविष्यासाठी करण्यासाठीच्या तरतुदी, गुंतवणुक या संदर्भातील खर्चांसाठी तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नी सोबत एखादं जॉईंट अकाउंट ठेवलेलं चांगलं. हे खाते ३-६ महिन्यांच्या आकस्मिक निधीसाठी एक मार्ग म्हणून वापरू शकता. मुलांसाठी करण्यात येणारी गुंतवणुक सुद्धा या खात्यातुन वळती केली जाऊ शकते.

एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे ५ फायदे (5 Benefits of having multiple savings accounts)-
  • हा एक जोखीम मुक्त पर्याय आहे (risk free option to put liquid money aside)
  • एकाधिक आर्थिक लक्ष्यांसाठी बचत करा (Save per financial goal)
  • आपत्कालीन परिस्थितीत खातेदारांना रोख रक्कम मिळते (build emergency corpus)
  • विविध बँकांद्वारे ऑफर केलेल्या सवलतींचा लाभ घ्या
  • अपघात किंवा मृत्यू झाल्यास विमा संरक्षण (हे तुमच्या बँकेच्या आणि खात्याच्या प्रकारानुसार बदलू शकत)
पण, एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे हे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत (Problems of having more than one savings account)-
  • किमान शिल्लक (Minimum Balance Need): एकाधिक बचत खाती असणे सोपे आहे, परंतु काहीवेळा- या सर्व खात्यांवर किमान शिल्लक राखणे कठीण होऊ शकते. तुमचा बराच पैसा हा किमान रक्कम ठेवण्यात अडकून राहील आणि त्यावर अगदीच कमी व्याज मिळेल. त्याएवजी हि रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यावर मिळणारा परतावा आकर्षक असू शकतो.
  • व्याजाचा तोटा: अनेक खात्यांमध्ये निधी पसरवल्याने व्याजाचे नुकसान होऊ शकते कारण अनेक बँका जास्त ठेवलेल्या रकमेवर जास्त व्याज देतात.
  • ऑटो-ट्रान्सफरमधील गुंतागुंत: सर्व ठेवी एकाच पेचेकमधून केल्या गेल्यास ऑटो ट्रान्सफरचा पर्याय क्लिष्ट होऊ शकतो. सर्व खाती आणि त्यात जमा झालेल्या रकमेचा मागोवा ठेवणे कठीण काम असेल.
  • जास्त शुल्क: काही बँका खात्यांवर जास्त शुल्क आकारतात, विशेषतः जेव्हा खात्यात कमी शिल्लक असते. एकापेक्षा जास्त खाती ठेवताना कोणताही खर्च होणार नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे.

Note: या लेखात व्यक्त केलेली मतं हि माझी स्वतःची, स्वानुभावावरून घेतलेली आहेत आणि याला आर्थिक सल्ला मानु नये. आर्थिक बाब हि व्यक्तिगणिक बदलणारी गोष्ट आहे, तुमच्या सद्यस्थितीचा योग्य विचार करून तुम्ही तुम्हाला अनुरूप असा निर्णय घेऊ शकता.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

2 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee