तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी(largest living animal in world) कोणता आहे?

blue-whale

तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी(largest living animal in world) कोणता आहे?

जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी कोणता बरेंच लोक “हत्ती” असं उत्तर देतील, आणि एक प्रकारें ते उत्तर बरोबर आहे. हत्ती हा जमिनीवर राहणार सर्वात मोठा प्राणी आहे, पण संबध पृथ्वीवर सध्या जिवंत असलेला सर्वात मोठा प्राणी (largest living animal) आहे – “ब्लू व्हेल (Blue Whale) किंवा निळा देवमासा“.

एका निळ्या देवमाश्याचं वजन साधारणतः १२ हत्तीनं इतका असतं. जर देवमाश्यानें पोटभर अन्न ग्रहण केलं तर त्या अन्नाचं त्याचं वजन सुमारें अडीच टनांपर्यंत भरू शकतं. कोळंबी सदृश्य क्रिल हे देवमास्याचं आवडत अन्न आहे.

एखादं लहान बाळ आरामात रांगू शकेल इतक्या मोठ्या रक्तवाहिन्या देवमाश्याला असतात.

अगदी नवजात ब्लू व्हेलचं वजन सुद्धा जवळपास ३००० किलों पर्यंत भरतं.

असं महाकाय शरीर असून सुद्धा देवमासा हा स्वभावाने सौम्य प्राणी आहे.

निळा देवमासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बाळाला थेट जन्म देताना बाकीच्या माशांप्रमाणे अंडी देत ​​नाही.

ब्लू व्हेल जीभ आफ्रिकन जंगलातील हत्तीइतकी मोठी असू शकते आणि त्यांचे हृदय किमान गोल्फ कार्टच्या आकाराचे असते.

ब्लू व्हेल 1,600 किमी अंतरापर्यंत एकमेकांना ऐकू शकतात. आणि कोणताही धोका दर्शवू शकवर्ल्ड कन्झर्व्हेशन युनियन (IUCN) च्या रेड लिस्टमध्ये ब्लू व्हेलला सध्या लुप्तप्राय म्हणून वर्गीकृत केले आहे.

मागील शतकात ब्लू व्हेल्सची अतोनात शिकार केली गेलीय आणि असं मानतात कि आता फक्त 10,000-25,000 ब्लू व्हेल जगातील महासागरांमध्ये अस्तित्वात आहेत. या प्रजातीला नामशेष होण्याचा धोका असल्याने त्यांच्या शिकारीवर जगात नाबादी घातलीये पण अजूनही त्यांची शिकार पूर्णपणे थांबली नाहीये.

एक निरोगी मनुष्य 2 ते 4 मिनिटे आपला श्वास रोखू शकतो परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हेल 40 मिनिटे ते 2 तास आपला श्वास रोखू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee