अमेरिकेतील H-1B व्हिसा म्हणजे काय आहे? What is H-1b Visa

अमेरिकेतील H-1B व्हिसा म्हणजे काय आहे? What is H-1b Visa

H-1B हा इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम 101(a)(15)(h) अंतर्गत युनायटेड स्टेट्ससाठी एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे.अमेरिकन कंपन्यांना विशेष व्यवसायांमध्ये तंत्रकुशल मनुष्यबळ अमेरिकेत आयात करण्याची संधी या व्हिसाद्वारे मिळते.

यामध्ये आयटी, वित्त, लेखा, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, गणित, विज्ञान यासारख्या विशिष्ट क्षेत्रात सैद्धांतिक किंवा तांत्रिक तज्ञांची आवश्यकता असलेल्या विशिष्ट व्यवसायात पदवीधर स्तरावरील कामगारांची नेमणूक अमेरिकन कंपन्यांना करता येते.

H-1B व्हिसा वैधता / H-1B Validity

राहण्याचा कालावधी

एच-१ बी व्हिसा साठी पात्र असणारी व्यक्ती स्वतःहून यासाठी अर्ज करू शकत नाही तर त्यासाठी कुणीतरी स्पॉन्सर लागतो, सामान्यपणे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहेत तीच कंपनी आवश्यकतेनुसार तुमचा व्हिसा स्पॉन्सर करून तुम्हाला आवेदन आणि आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करते.

एच- १ बी व्हिसा हा ६ वर्षाच्या पूर्ण मुदतीसाठी दिला जातो. तुमच्या आवेदनाच्या कागदपत्रांची छाननी करून तुमच्या प्रोजेक्ट कालावधी नुसार तो दिला जातो पण जास्तीतजास्त मुदत हि ६ वर्षांची असते. त्यापेक्षा कमी कालावधीचा व्हिसा मिळाल्यास ती मुदत संपण्यापूर्वी तुम्ही ती वाढवून घेऊ शकतात.

एच -१ बी व्हिसा असणाऱ्या तंत्रज्ञानां अमेरिकन ग्रीन-कार्ड साठी आवेदन करता येते आणि ते मिळाल्यानंतर त्यांना सध्याचा व्हिसा संपल्यानंतर नवीन वीष घेण्याची आवश्यकता राहत नाही. ग्रीन कार्ड आवेदन केलं असतांना जर तुम्हाला आय-१४० हे स्टेटस मिळालं असेल तर तुम्ही ६ वर्षे मुदत संपल्यानंतर सुद्धा अमेरिकेत राहू शकता फक्त तुम्हाला अमेरिकेबाहेर प्रवास केल्या नंतर जर पुन्हा प्रवेश करायचा असेल तर अमेरिकन वकिलातीमध्ये जाऊन स्टॅम्पिंग करून घ्यावी लागते.

एच-१बी व्हिसा वर काम करणारी व्यक्ती तिच्या स्पॉन्सर साठीच काम करून पगारातून पैसे कमावू शकते. तिला इतर दुसरी काम करण्याची परवानगी नाही. तरीसुद्धा एच-१बी व्हिसा असणारी व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकते पण त्यासाठी काम करू शकत नाही आणि त्यातून अर्थार्जन करू शकत नाही.

दरवर्षी सुमारे ८५००० व्हिसा परदेशवासियांना दिले जातात आणि त्यातील सर्वाधिक संख्या हि भारतीयांची आणि आणि त्यानंतर चीन ची.

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee