पैश्याचा इतिहास (History Of Money)

history-of-money

History Of Money / पैश्याचा इतिहास

“पैसा”.

अक्ख जग याच्या अवतीभोवतीच चाललंय.

माणसातला प्रत्येकजण पैस मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. कुणाला यश मिळत तर कुणाला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. पैसा म्हणजे अगदी खरा आणि एकुलता एक धर्म असावा इतक्या भक्तिभावानं पुजला जातो कि जो मिळवण्यासाठी माणुस कुठल्याही गोष्टीला नकार देऊ शकत नाही.

असा कुणीही सापडणार नाही ज्याला मिळत पैसा मिळत असेल तर तो म्हणेल माझ्याकडं आहे अजून नको.

तर अश्या पैश्याला इतकं महत्व असतांना कि ज्याच्या नसण्यामुळं जगणं कठीण किंवा अश्यक्य होऊन जातं कुणी असं म्हटलं कि एक वेळ अशी होती जिथं “पैसा” अस्तित्वातच नव्हता – हे खरंच वाटणार नाही.

पण, “पैसा” कधीतरी खरंच अस्तित्वात नव्हता.

चला तर थोडक्यात पाहुयात या “पैश्याचा” अर्थपुर्ण इतिहास –

पण, पैसा म्हणजे नक्की काय? WHat is money in marathi

आज आपण पाहतोय हा पैसा हा धातूची नाणी, रंगीत छापलेला कागद आणि सध्या जवळपास प्रत्येकाला आकर्षित करण्याऱ्या डिजिटल करन्सी रूपात आपल्याला दिसतो.

पैसे म्हणून मान्य असलेल्या प्रत्येक गोष्टीला एक ठराविक सरकारतर्फे मान्यताप्राप्त किंमत असते, ज्या किंमतीची हमी सरकार घेत आणि त्यामुळं ती एक किंमत प्रत्येकजण मान्य करतो. या गोष्टीला “लीगल टेंडर” म्हणतात. सरकार जोपर्यंत या कुठल्याही गोष्टीला “लीगल टेंडर” म्हणून मान्यता आहे त्या गोष्टीला पैसा म्हणून मान्यता आहे.

लीगल टेंडरच महत्व

लीगल टेंडरच महत्व काय तर –

उदाहरण, म्हणुन २०१६ साली मोदी सरकारनं जेव्हा ५०० आणि २००० च्या चलनातील नोटांचं लीगल टेंडर काढून घेतलं तेव्हा त्या नोटांची किंमत शून्य झाली आणि त्यांना आर्थिक व्यवहारातुन वगळण्यात आलं कारण सरकारतर्फे त्या कागदी तुकड्यांची किंमतीला असलेली हमी नाकारण्यात आली होती.

आजच्या पैश्याचं स्वरूप हे कागदी नोटा, धातूचे पैसे किंवा ऑनलाईन पैसे ( जे बँकेमार्फत ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरले जातात) आणि सध्याचा डिजिटल करंसीचा प्रकार असं काळानुरूप बदलत आहे. बहुतेक वेळा, “पैसा” आणि “चलन” हे शब्द एकमेकांच्या बदल्यात वापरले जात असताना, पण या दोन्ही संज्ञा एकसमान नाहीत. पैसा ही मूळतः एक अमूर्त संकल्पना आहे, तर चलन हे पैशाच्या अमूर्त संकल्पनेचे भौतिक (मूर्त) स्वरूप आहे.

पैशाची उत्क्रांती (Evolution of Money)

वस्तुविनिमयाची बार्टर पद्धती (Barter method of exchange)

बार्टरचा शब्दशः अर्थ म्हणजे देवाणघेवाण. पूर्वीच्याकाळी जेव्हा “पैसा” अस्तित्वात नव्हता तेव्हा एका वस्तूच्या बदल्यात आपल्याजवळच्या दुसऱ्या वस्तूची देवाणघेवाण (exchange of goods) करून “अर्थपुर्ण” व्यवहार केले जात – या पद्धतीला बार्टर पध्दती म्हणत.

या बार्टर पध्दतीचा मागोवा घेतल्यास तीच ज्ञात मूळ 6000 BC पर्यंत आढळतं. मेसोपोटेमियाच्या फोनिशियन लोकांनी त्यांच्या सागरी व्यापारांत महासागराच्या पलीकडे असलेल्या इतर शहरांमध्ये असलेल्या लोकांना वस्तूंची देवाणघेवाण केली अशी सर्वातजुनी ज्ञात नोंद आहे. बॅबिलोनियनने एक सुधारित वस्तु विनिमय प्रणाली देखील विकसित केलेली होती.

अन्न, चहा, शस्त्रे आणि मसाल्यांसाठी वस्तूंची देवाणघेवाण होते. काही वेळा मानवी कवटीचाही वापर केला जात असे.

मीठ ही देवाणघेवाण केलेली आणखी एक लोकप्रिय वस्तू होती. मीठ इतके मौल्यवान होते की रोमन सैनिकांचे पगार त्याबरोबर दिले जात होते. मध्ययुगात, युरोपियन लोक रेशीम आणि परफ्यूमच्या बदल्यात हस्तकला आणि फर खरेदी करण्यासाठी जगभरात प्रवास करत. रेस इंडियन जमातींनी मस्केट बॉल, हरणांचे कातडे आणि गहू यांची देवाणघेवाण केली.

जेव्हा “पैसा” निर्माण केला गेला तेव्हा वास्तूच्या देवाणघेवाणीची पद्धत संपली नाही तर तो अधिक संघटित झाली. आजसुद्धा पैश्याच्या ऐवजी वस्तूंची देवाणघेवाण होतेच. कित्येकदा दोन देशांमध्ये आर्थिक व्यवहार होतांना एकाकडून घेतलेल्या वास्तूच्या बदल्यात तितक्याच किंमतीची दुसरी वस्तू देऊन व्यवहार पूर्ण करण्याची पद्धती आहे.

1930 च्या दशकात आलेल्या अमेरिकन महामंदीच्या काळात देखील पैशाच्या कमतरतेमुळे वस्तुविनिमय हा आर्थिक व्यवहारांचा एक लोकप्रिय प्रकार होता. त्याचा उपयोग अन्न आणि इतर विविध सेवा मिळविण्यासाठी केला जात असे.

नाण्याच्या अस्तित्वाची कहाणी (Coin minting)

इ.स.पूर्व ७७० च्या सुमारास चीनमध्ये सुद्धा वापरण्यायोग्य साधनांचा किंवा शस्त्रांचा वापर वास्तुविनिमयासाठी होत होता. कल्पना करा कुणाला काही जास्त वस्तू बाजारातून आणायच्या आहेत अन त्यासाठी ती व्यक्ती अश्या बऱ्याच वस्तू घेऊन घरून निघाला पण त्या वस्तू सांभाळ करण काही सोपं नव्हतं. मग थोडा व्यावहारिक विचार म्हणून त्या वस्तूंचा छाप असलेली छोटे काशाचे तुकडे बनवले गेलेत आणि त्यांना त्यावर असलेल्या वस्तूचं मूल्य ग्राह्य धरण्यात आलं – यातून जन्म झाला धातूच्या नाण्यांचा – थोडक्यात धातूंच्या नाण्यांना व्यवहारात आणण्याचं श्रेय चिनी संस्कृतीला जातं.

आधुनिक लोक नाणी म्हणून ओळखू शकतील अशी वस्तू वापरणारा चीन हा पहिला देश असला, तरी चलन म्हणून वापरता येणारी नाणी तयार करण्यासाठी औद्योगिक सुविधेचा वापर करणारा जगातील पहिला प्रदेश लिडिया (आता पश्चिमेकडील तुर्कीचा प्रदेश ) युरोपमध्ये होता. आज, या प्रकारच्या सुविधेला टांकसाळ म्हणतात, आणि अशा प्रकारे चलन तयार करण्याच्या प्रक्रियेस मिंटिंग असे संबोधले जाते.

600 बीसी मध्ये, लिडियाचा राजा अ‍ॅलिट्सने पहिले अधिकृत चलन काढले. ही नाणी इलेक्ट्रमपासून बनवली गेली होती, चांदी आणि सोन्याचे मिश्रण जे नैसर्गिकरित्या उद्भवते आणि नाण्यांवर संप्रदाय म्हणून काम करणाऱ्या प्राणी चित्रांचा शिक्का ठेवण्यात आला होता.

history of money
लिडियाचा राजा क्रोएसस (561-545 BC), समोर: सिंह आणि बैल प्रोटोम्सने जारी केलेले सिल्व्हर क्रोसीड.
550 ईसापूर्व सुमारे क्रोएसस, लिडियनचे सोन्याचे नाणे
550 ईसापूर्व सुमारे क्रोएसस, लिडियनचे सोन्याचे नाणे

त्या काळाच्या तुलनेत आधुनिक असलेल्या लिडियाच्या चलनाने देशाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही व्यापार प्रणाली वाढवण्यास मदत केली, ज्यामुळे ते आशिया मायनरमधील सर्वात श्रीमंत साम्राज्यांपैकी एक बनले. आज, जेव्हा असं कोणी “क्रोएसससारखे श्रीमंत” चा उल्लेख करतो तेव्हा ते शेवटच्या लिडियन राजाचा संदर्भ असतो.

कागदी चलन (Paper Money)

आज पण वापरतो ती कागदी चलन बनवण्याचं श्रेय सुद्धा “चिनी” लोकांनाच जात. AD 618-907 दरम्यान चिनी प्रदेशात तांग राजवंश सत्तेत असतांना कागदी पैश्याची निर्मिती आणि वापर सुरु झाला असं मानण्यात येत. १७व्या शतकात युरोपमध्ये कागदी पैस्याचा वापर सुरु झाला पण कागदी पैशांचा उर्वरित जगात प्रसार होण्यासाठी आणखी एक किंवा दोन शतके लागली.

याच चिनी संस्कृतीची आपलयाला आणखी एक अर्थविषयक शब्द दिला – रोख (Cash).

रोख(Cash) हा शब्द मूळतः काई-युआन्स नावाच्या तांग राजवंशात वापरल्या जाणार्‍या चौकोनी छिद्रांसह गोल कांस्य नाण्यांच्या प्रकाराचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला.

युरोपीय देश आपल्या साम्राज्यवादी धोरणांनी जिथं एक मोठा भूभाग आपल्या नियंत्रणात ठेवला होता त्यामुळं त्यांना नाण्यांसाठी लागणारा धातु अतिशय स्वस्तात नि मुबलक प्रमाणांत उपलब्ध होत होता त्यामुळं कागदी चलनांकडे ते थोडी उशिराच वळलेत.

पण पहिले अधिकृत कागदी चलन हे हाताळायला सोपं पडेल म्हणून युरोपात कुण्या सरकारनं नाही तर खाजगी बँकांनी वितरित करायला सुरवात केली होती.

प्लास्टिक मनी (Plastic Money)

बदलल्या तंत्रज्ञानानं काही गेल्या दशकापासून पण पैश्याचा नवीन प्रकार अंगिकारला आहे – प्लास्टिक मनी.

बॅंकांतर्फे खातेधारकांना दिल्या गेलेल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून आपण पैसा बरोबर न बाळगता सुद्धा विनासायास आर्थिक व्यवहार पार पाडू शकतो, त्यासाठी हातात पैसा असण्याची गरज नाही.

आभासी करन्सी (Virtual Currency)

2009 मध्ये सातोशी नाकामोटो या व्यक्तीने प्रसिद्ध केलेले बिटकॉइन हे आभासी चलनांसाठी मानक बनले. आभासी चलनांना कोणतेही भौतिक अस्तित्व नाही, त्यांना कुणाही सरकारांची मान्यता नाही – खरं सांगायचं म्हणजे ते चलन नाही.

virtual-currency
आभासी चलन / Virtual Currency

हे आभासी चलन अतिजातील संगणकीय प्रक्रियांद्वारे निर्मित केलं जाते आणि यावर कुणाचंही नियंत्रण ठेवता येत नाही. अर्थात अनियंत्रित असल्यामुळेच सरकार त्यांना लीगल टेंडर म्हणुन मान्यता देऊ शकत नाही – म्हणुन कायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा वापर पैसा म्हणून स्वीकार केला जात नाही.

पैश्याची निर्मिती जसं प्रत्येक सरकारं आपल्या टांकसाळीत करतात त्याचप्रकारे जर कुणा व्यक्तीकडे संगणकीय ज्ञान आणि त्यासाठी लागणारी तांत्रिक कौशल्य असतील तर ती व्यक्ती स्वतःच आभासी चलन बनवू शकते. मग, विचार करा जर लोक आपणहून असा स्वतःचा “पैसे निर्मितीच्या” उद्योगाला लागलीत तर काय अनागोंदी माजेल ते.

म्हणुन या प्रकारची आभासी चलन अजूनतरी व्यवहारांपासून अलिप्तच आहेत. इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या आकडेवारी नुसार अश्या आभासी चलनांची संख्या काही हजारांत आहे.

आशा आहे पैश्याबद्दलचा हा थोडक्यात इतिहास तुम्हाला आवडला असेल.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee