BEDMAS – PEDMAS – BODMAS

BEDMAS / PEDMAS / BODMAS

सामान्य कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=2 आणि मोबाइल कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=5 दोन्ही उत्तर अगदी बरोबर आहेत, कुठलंही उत्तर चुकलेलं नाही किंवा यात मोबाईल/संगणकावर असलेल्या कॅलक्युलेटर प्रोग्रॅम मध्ये सुद्धा काहीही दोष नाही, त्यांनी अपेक्षित आणि बरोबर परिणाम दिलेला आहे.

मग तुम्हाला २ वेगवेगळी उत्तर का मिळाली? तर त्याच उत्तर आहे हे एक्सप्रेशन्स ज्या ऑर्डर मध्ये विचारात घेतले गेलेत त्यामुळं. नवल म्हणजे आपण अशी साधारण एक्सप्रेशन्स ज्या ऑर्डर मध्ये विचारात घेतो ती पद्धत जगभरात वेगवेगळी आहे, त्यामुळे हे गणित चुकलंय असं म्हणता येत नाही.

BEDMAS / PEDMAS / BODMAS काय आहे? bedmas pedmas bodmas in marathi

आता या गणिताचं उदाहरणे घेतलं तर आपण सामान्यपणे या क्रिया ज्या क्रमाने आल्या आहेत त्यानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. जसं ४+४ = ८ आणि मग ८%४ = २, म्हणजे डावीकडून उजवीकडे.

गणितामध्ये या क्रियांचा क्रम हा ठरलेला आहे जसं वर्ग, गुणाकार किंवा भागाकार (जे असेल ते आणि दोघ असतील तर डावीकडून उजवीकडे )आणि नंतर बेरीज किंवा वजाबाकी (जे असेल ते आणि दोघ असतील तर डावीकडून उजवीकडे ), या नियमानुसार हेच गणित आपण ४%४=१ आणि १+४=५ असं सोडवू शकतो. संगणक प्रोग्रामिंग च्या अधिकांश भाषांमध्ये गणिताच्या याच नियमाचा विचार केला जातो.

या गणितीय क्रिया गणितात आणि प्रोग्रामिंग खाली दिलेल्या क्रमानुसार घेतल्या जातात.

  1. कंस (Bracket) – first priority
  2. वर्ग (exponential) – second priority
  3. गुणाकार (multiplication) किंवा भागाकार(division) – third priority, if both present left to right
  4. बेरीज (addition) किंवा वजाबाकी(substraction) – fourth priority, if both present left to right

या नियम सोप्या प्रकारे लक्षात राहावा म्हणून अमेरिकन लोक याला BEDMAS – Bracket Exponential Division Multiplication Addition Subscration असं म्हणतात.

कॅनेडियन आणि न्यूझीलंड PEDMAS – Parantheses Exponential Division Multiplication Addition Subscration असं म्हणतात.

भारत, ब्रिटन, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये हेच BODMAS – Bracket Order Division Multiplication Addition Subscraction म्हणून म्हटलं जात.

Reference : Order of operations – Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee