पुस्तक समीक्षा – चाणक्य (Chanakya)
चाणक्य (Chanakya) माहिती नाही असा व्यक्ती सापडणं कठीण. आपल्या प्रगल्भ ज्ञानाने आणि अर्थशास्त्र , कूटनीती, राजशास्त्र आणि इतर अनेक विषयाच्या अतुल्य योगदानाने जगभर प्रसिध्द असलेलं व्यक्तिमत्व. चाण्यक्यांनी त्याकाळी सांगितलेली तत्वे अगदी आजच्या काळातसुद्धा जशीच्यातशी लागू पडतात.
तत्कालीन भ्रष्ट राजसत्तेकडून झालेल्या भ्रमनिराशेतून चाणक्यांच्या वडिलांना दिलेला मृत्युदंड अगदी त्यांचे पश्चातविधी सुद्धा करायला मिळू नये ह्यांचा राग, तेव्हा लहान वय असल्यानं काही करू शकत नसल्याने पण प्रचंड आत्मविश्वासानं केलेलं विद्याग्रहण, सर्वोत्तम आचार्य म्हणून मिळवलेली प्रसिद्धी आणि मुख्य म्हणजे आपल्या ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप म्हणून एक अनौरस राजपुत्राचा घडवलेला एक आदर्श राजा ज्याने भारतवर्ष एक अखंड प्रजासत्ताक म्हणून निर्माण केलं आणि परदेशी शत्रुंना मात दिली..साऱ्या घटना वाचतांना छोट्या वाटतात परंतु त्याकाळी छोट्या तुकड्यांत विभागलेल्या आपल्या भारतभूमीला जण एकत्र आणून अखंड भारताची निर्मिती करण्याचं खार श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आचार्य चाणक्य यांनाच.
अश्या या भारताच्या महान सुपुत्राची कहाणी लेखकानी अतिशय सोप्या पण परिणामकारक शैलीमध्ये ह्या पुस्तक रूपात साक्षात उभं केलाय.
अर्थशास्त्र, कूटनीती इत्यादी विषयांबद्दल ह्या पुस्तकात फारशी चर्चा केलेली नाहीये परंतु पुस्तकाचा मुख्य विषय हा आचार्य चाणक्य ह्यांचं चरित्राची ओळख करून देणं असल्याने इथं वाचकांना थोडा भ्रमनिरास होऊ शकतो.