एका तेलियाने (Eka Teliyane – 1 and Only 1 Master in Oil Game)
- लेखक : गिरीश कुबेर
- प्रकाशक : राजहंस प्रकाशन
- एकूण पाने : 260
- किंमत: ₹ 280.00
एका तेलियाने – हे एक प्रकारचं चरित्र आहे सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. ‘ओपेक’, ‘ओआपेक’सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. “शेख अहमद झाकी यामानी” या व्यक्तीच.
यांचं महत्व इतकं कि हा मनुष्य आजारी पडला तर अमेरिकेची आणि इतरही देशांची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा कुण्या देशावर प्रसन्न झाला, तर अनेक त्या देशांत अक्षरशः दिवाळी साजरी व्हायची.
कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे.
कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवादी आणि लिबियाच्या हुकूमशाहीची मदत घेऊन याचं अपहरण करण्याचा घातलेला घाट आणि त्यांना शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री.
तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा… डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी.
एका तेलियाने: शेख अहमद झाकी यामानी
फ्रेंच, इंग्रजी, अरबी, फारसी अशा अनेक भाषांवर हुकमत. देशोदेशींचे कायदे, संस्कृती यांचं चक्रावून टाकणारं ज्ञान, कविता उद्धृत करण्याइतकी सांस्कृतिक श्रीमंती अशा अनेक गुणांनी ठासून भरलेलं व्यक्तिमत्व..
एखाद्याच्या कर्तृत्वात त्याच्या मायदेशाच्या भाग्यरेषेचा उगम असतो. शेख अहमद झाकी यामानी यापेक्षाही भाग्यवान. कारण ते जन्माला आले तेव्हा त्यांचा मायदेशच जन्मला नव्हता. गावंढळ, मागास आणि शरीराने तगडय़ा अरबांचे तांडेच्या तांडे हलकीसलकी कामं करत इकडून तिकडे फिरत. मक्का आणि मदीना त्या प्रांतात असल्यामुळे भाविकांची नेआण, त्यांच्या जेवणाखाणाची सोय इतकंच काय ते उत्पन्नाचं साधन. पुढे जगातला धनाढय़तम म्हणून ओळखला गेलेला महमंद बिन इब्न सौद हाच जिथे उंटावरच्या व्यापाऱ्यांना चहापाणी देऊन पोटाची खळगी भरत होता तिथे बाकीच्या नागरिकांची काय कथा? आणि नागरिक म्हणावी अशी प्रजा तरी कुठे होती, हाही प्रश्नच.
अशा वातावरणात मक्केत धार्मिक नियमांचा अर्थ लावणारा ‘न्यायाधीश’ आणि साहित्यप्रेमी महिलेच्या पोटी झाकीचा जन्म झाला. आसपासचं वातावरण असं असतानाही आपल्या मुलानं परदेशी जाऊन शिकायला हवं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. धर्माचरण करणारे होते तरी आधुनिकतेचं महत्त्व न कळणाऱ्या कट्टर धर्मवेडय़ांसारखे ते नव्हते. त्यांनी अहमदला शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. त्या वेळी. तिथं आधी हॉर्वर्ड आणि नंतर मॅसेच्युसेट्सचं एमआयटी अशा हव्याहव्याशा विद्यापीठांत तो शिकला. महत्त्वाचं म्हणजे शिकून तो अमेरिकावासी झाला नाही. परत आला. आपल्या गावंढळ मायदेशात. रियाधला येऊन अहमद छोटीमोठी नोकरी करू लागला.
वर्तमानपत्रात लिहायची हौस त्याला. भरपूर लिहायचा. विषय सगळे आधुनिक. पण मांडणी मातृभाषेत. त्या वेळी राजे फैझल गादीवर होते. तो देश लोकशाही तेव्हाही नव्हता आणि आता तर नाहीच नाही. संपूर्ण देश म्हणजे एका घराण्याची खासगी मालमत्ता. पण या मालमत्तेवर निरंकुश सत्ता असलेले राजे फैझल चक्क वर्तमानपत्र वाचायचे आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायचे, निर्णय घ्यायचे. आणि हेही अनेकांना माहीत नसेल कदाचित की इस्लामच्या मक्का-मदीना या कडव्या धर्मकेंद्रांचा निसर्गदत्त रक्षक असलेला हा राजा विचारांनी आधुनिक होता. इतका की, त्या वेळी त्यांनी महिला शिक्षणासाठी शाळा काढली होती आणि सर्व बाप्येच असले तर या शाळेत कोणी मुली/ तरुणी येणार नाहीत हे माहीत असल्यानं आपल्या पत्नीला शाळेत कामाला लावलं. सौदीची महाराणी शिक्षिका होती त्या वेळी.
तर अहमदचं वर्तमानपत्रीय लिखाण राजे फैझल यांनी वाचलं आणि त्याला बोलावून घेतलं. आपल्या पंखाखाली घेतलं.
अरबस्थानात जेव्हा तेलाचे झरे सापडलेत पण अरबांना हे तेल काहीशी खातात ह्याचा गंध सुद्धा नव्हता तेव्हा अमेरिकेनं चालाखीनं पुढील ७० वर्षांसाठी तेलाचे हक्क स्वतःकडे मंजून करून घेतलेत. यामुळं सिद्दीच्या भुमीतून जे तेल निघायचं त्यावर पहिला हक्क होता अमेरिकेचा आणि सौदीच्या वाट्याला जे काही तेल यायचं ते सुद्धा अमेरिका आपल्या तेल कंपनीमार्फत कमीत कमी भावात आपल्या पदरात पासून घेत असे आणि तेच तेल शुद्धीकरणानंतर चढ्या भावाने सौदीला विकत होता – हि तेलचलाखी सौदीत कुणाच्या लक्षात अली असेल तर ती राजे फाझल यांच्या.
तेव्हा परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आलेल्या सुसंकृत, चलाख आणि धुर्त तरुणावर सौदीचे राजे फझल यांनी आत्मविश्वासानं तेल मंत्री म्हणून नियुक्ती केली. याच अमेरिकेतुन या तेल उद्योगांचे सर्व छक्केपंजे शिकून आलेल्या या तरुणानं आपल्या पुढील ३५ वर्षांच्या कारकिर्दीत सगळ्या जगाला आपल्या चातुर्याने खेळवत ठेवलं, सौदीतल्या अरबांना तेलाचं महत्व कळलं ते यांच्यामुळेच.
स्वतःच्या गुर्मीत असणाऱ्या आणि अरबांना तेलाविषयी काहीच महत्व न देणाऱ्या अमेरिकेला १९७३ साली एकतर्फी तेलबंदी घालून अक्षरशः नाक घासत सौदीकडे मिनतवाऱ्या करायला लावण्याची ताकत फक्त याच पठ्ठयाने दाखवली. या घटनेची इतकी धास्ती जगात इतकी बसली कि ह्याचं मन सांभाळण्यासाठी काय करावं लागलं तरी बेहत्तर पण हा नाराज होणार नाही याची काळजी प्रत्येक देश घेत होता.
तेलाचा एक शस्त्र म्हणुन ओळख मिळवुन दिली ती यानेच.
आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी याला स्वतःच भाऊ म्हणुन म्हणायच्या हे याच महत्व. देशोदेशींचे राष्ट्रप्रमुख याच्या काही मिनिटांच्या भेटीसाठी अक्षरशः महिनोंमहिने वाट पाहायचे, अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा वाट पाहायला लागणार हा अवलिया.
अमेरिकेनं इराक, अफगाणिस्तान आणि लिबिया इत्यादी देशांच्यावर केलेल्या आक्रमणाविरुद्धची खरी गोम समजून घायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचलंच पाहिजे.
या पुस्तकाचा विषय जरी तेल, आंतरराष्ट्रीय राजकारण असला तरी ते कुठंही कंटाळवाणं होत नाही आणि एकदा हातात घेतल्यानंतर संपेपर्यंत खाली सुद्धा ठेववत नाही.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.
Khup chhan ani vegali mahiti milali.. ani postal vachayala ek Navin vishay sapadala… thank you😊🙏🏻
Thanks.