ब्लॉगचा विषय (Blog Niche) कसा निवडावा?
तुम्हाला ब्लॉग सुरु करायचा आहे (How to create an blog in Marathi)? मग तुम्हाला हा प्रश्न पडणं हे अत्यन्त स्वाभाविक आहे इतर सर्वांसारखे तुम्ही सुद्धा याविषयीं गोंधळलेले असू शकता शेवटी तुमचा ब्लॉग यशस्वी होणं सर्वतः तुमच्या विषयावरच निर्भर करत. तस पाहिलं तर हा ज्याचात्याच्या वैयक्तिक आवडीचा किंवा कुठल्या उद्देशानें ब्लॉग बनवायचा आहे यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे.
ज्यांना स्वतःच साहित्य म्हणून काही लिखाण करण्याची आवड आहे, किंवा तुम्ही कुठल्या विशिष्ट विषयांत तज्ञ असाल आणि तुम्हाला त्याविषयासंबंधित माहिती आपल्या समविचारी लोकांसोबत सामायीक करण्याची आवड असेल तर साधारणपणें या प्रकारच्या ब्लॉग ला वैयक्तिक किंवा खाजगी ब्लॉग म्हटलं जात. याचा मुख्य उद्देश हा फक्त आणि फक्त स्वतःला आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक ठेवणे असून फारच कमी लोकं पैसा मिळवण्याची इच्छा ठेवतात. समविचारी लोकांसोबत संपर्कात राहून स्वतःचा छंद जोपासणे आणि वाढवणं हे मुख्य ध्येय असतं.
गेल्या काही वर्षांपासून ब्लॉगिंग बद्दलची वाढती लोकप्रियता लक्षात घेता त्याच मुख्य कारण हे ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं हेच आहे. स्वतःच्या ब्लॉगसाईट अनेकांनी स्थिर उपान्नाचा स्रोत बनवलेला आहे आणि हे मुळीच कठीण नाही.
अश्या व्यावसायिक उद्देशाने जर तुम्ही ब्लॉग बनवण्याचा विचार करत असाल तर ब्लॉगसाठी यथायोग्य विषय निवडणं अतिशय महत्वाचं आहे.
व्यावसायिक उद्देशाच्या ब्लॉग साठी तुम्ही काही गोष्टींचा विचार करायला हवा –
१. तुम्ही निवडलेला विषयाचे (Blog Niche) बाजारमूल्य चांगले असावे.
निवडलेल्या विषयाला बाजारमूल्य असं गरजेचं आहे म्हणजेच लोकांना त्या विषयामध्ये रस असणं महत्वाचं आहे. जितक्या जास्त लोकांना तुमच्या विषयामध्ये रस असेल तितका मोठा प्रेक्षकवर्ग योग्य प्रयत्नांनी तुम्ही ग्राहक म्हणून सुद्धा जोडू शकता.
२. शक्य असेल तर तुमचा विषय तुमच्या आवडीचाच असावा.
तुम्ही निवडलेला विषय तुमचा आवडीचा असणं फार गरजेचं आहे त्याच फक्त आणि फक्त कारण म्हणजे तुम्ही त्याला पूर्ण वेळ देऊ शकाल. साधारणतः मानवी स्वभावानुसार आपण कुठलीही गोठया ज्यात आपल्याला खास असा रस नाही फार वेळ करू शकत नाही. अश्यात जर तुम्हीमागणी असलेला विषय निवडला पण त्याला तुम्ही योग्य वेळ देऊ शकत नसाल तर काही काळानंतर तुमचा इंटरेस्ट आपोआप कमी हौस तुमचं लक्ष ब्लॉगवरून कमी होण्याचा परिणाम तुमच्या ब्लॉगवर होऊ शकतो. याउलट तुमचा विषय तुमच्या अब्दीचा असला तर तुम्ही त्याला योग्य न्याय देऊ शकता मग भलेही तुम्ही थोडा जास्त वेळ घेतला तरी चालेल.
३. ब्लॉग मॉनेटायझेशन (Blog Monetization) साठी तुमच्या विषयाला स्कोप असला पाहिजे.
तुम्ही निवडलेला विषय जर लोकप्रिय असणारा असेल तर तुम्हाला तुमचा ब्लॉग मॉनिटायझेशन करायला फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. तुमचं कॉन्टेन्टस जर चांगल्या प्रतीचे आणि तुमच्या वाचकांना उपयोगी असतील तर तुमचे वाचक त्यासाठी पेड सुब्स्क्रिप्शन, पुस्तकांची खरेदी वगैरे माध्यमातून तुमच्या ब्लॉगशी एकनिष्ठ राहू शकतात जेणेकरून तुमचा मॉनेटायझेशनचा उद्देश पूर्ण होऊ शकतो.
४. तुमच्या विषयाला भविष्यामध्ये तुम्ही अजून वाढवू शकत असाल तर उत्तम.
तुम्ही निवडलेला विषय आज जरी मागणी असली तरी तो सदासर्वकाळ मागणीत राहिलच असे नाही, तेव्हा भविष्याचा विचार करता तुम्ही हाच विषय इतर उपविषयांध्ये विभागु शकत असाल तर उत्तम.
नेहमी फायदेशीर असणारे ब्लॉगसाथीचे विषय :
- फूड (Food) / पाककृती (Recipes)
- ट्रॅव्हल / प्रवासवर्णन (Travel Blogs, Solo Travel Blogs)
- फॅशन (Fashion Blogs)
- ब्लॉगिंग (Blogging related blogs)
- ड्रॉपशिपिंग (Drop-shipping blog/business)
- पर्सनल फायनान्स (Personal Finance Blogs)