Browsing Tag
आर्थिक शिस्त
1 post
November 22, 2021
आता खरेदी करा, नंतर पैसे द्या (BNPL)
अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ग्रेट 'शॉपिंग' फेस्टिवल्स दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा थोडा अभ्यास करून आलेल्या निष्कर्षानंतर या आस्थापनांच्या अश्या लक्षात आलं की, आपला ग्राहकांमधला एक मोठा तरुण वर्ग असा आहे को अजून पूर्णपणे आर्थिक बाबींवर सशक्त नाही. हा युवावर्ग आणि त्यांच्या सारखेच इतर ज्यांना चांगला क्रेडिट स्कोर नसल्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा छोटी कर्जे वगैरे मिळवण्यात थोडी अडचण येते आणि साहजिकच खरेदी करण्याला पण बंधन येतात. असा संभाव्य ग्राहक हातातून निसटून जाऊ देण्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड ऐवजी त्याला कुठल्या प्रकारे छोटी कर्जे मिळवून देऊ शकलो तर तो ते पैसे आपल्या प्लॅटफॉर्मवर खर्च करू शकतो - आणि या विचारातून त्यांनी जन्माला घातली हि एक नवीन योजना - "आता खरेदी करा, नंतर पैसे द्या (Buy Now Pay Later - BNPL)"
No comments