स्क्रीन टाइम प्रॉब्लेम (Screen time problem)

screen-time-issues

स्क्रीन टाइम प्रॉब्लेम (SCREEN TIME PROBLEM)

मागच्या दोन वर्षांच्या कोरोना दरम्यान आपल्या जीवनात बरेच बदल झालेत. आपल्या सवयी बदलल्यात, आहार बदलला, गरजा बदलल्यात, थोडक्यात काय तर कोरोनानें आपलं जीवन पार घुसळुन ठेवलय.

COVID-19 (COVID issues) महामारीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय म्हणुन सरकारद्वारे लागू केलेल्या पहिल्या लोकडाऊनची सुरवात झाली तेव्हा सर्व काही बंद होऊन आपण आपल्या घरट्यात कोंडले गेलो तेही बरीच महिने. बहुतेकांचं ऑफिसचं काम बंद, करायला फार काही नाही, अनेक लोक त्यांच्या घरी परत येऊ शकले नाहीत, अनेक परदेशी भूमीत अडकले आणि अनेक एकांतात. त्यात आपल्या रिलायंन्सने स्वस्तात आणि भरपूर डेटा देऊ केलेला – मग याची परिणीती झाली आपला डिजिटल उपकरणांचा वापर अनेक पटींनी वाढण्यात.

वेळ घालवायचा कसा अश्या विवंचनेत असणाऱ्यांना सोपा उपाय हातोहात सापडला (खरं म्हणजे आपल्या हातातच सापडला – मोबाईल). लोकं तासंतास मोबाईल मध्ये डोकं घालून राहू लागलेत. अनेकांना टिकटॉक सारखं व्यसन लागलं. त्यातून कुणाचा आर्थिक फायदा झाला, कित्येकांना ऑनलाइन स्टारडम मिळुन पैसा कमावण्याचा एक मार्ग सापडला.

पण या काळापासुन अनेकांना मोबाइलचं जणू व्यसनच लागलं. अगदी मोबाईल घेऊन झोपणं, बाथरूम मध्ये सुद्धा मोबाईल शिवाय काम चालेनासं झालं. (Mobile impact on health)

Mobile Phone impact on health

स्क्रीन टाइम म्हणजे कार्यालयीन कामाचे नियोजित केलेले तास किंवा शैक्षणिक हेतू साठी केलेला डिजिटल उपकरणांचा वापर तसेच याव्यतिरिक्त विश्रांती आणि मनोरंजनासाठी युट्युबवर विडिओ पाहणं, गेमिंगचे अनियंत्रित तास, किंवा सोशल मीडिया वापरणे या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो, यासाठी डिजिटल उपकरणे वापरणे. या सर्व क्रियांसाठी तुम्ही व्यतीत केलेला वेळ हा स्क्रीन टाईम च्या व्याख्येत बसतो.

कार्यालयीन आणि शाळेसाठी डिजिटल उपकरणांचा वापर हा आवश्यक आणि सहेतुक आहे पण त्याव्यतिरिक्त इतर मनोरंजनासाठी या उपकरणांचा जास्त वापर हा नक्कीच टाळता किंवा आरोग्य दृष्ट्या कमी करता येण्यासारखा आहे.

हे मान्य की प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळं आपलं जीवन सुसह्य होत आहे पण त्यामुळं आधी नसलेल्या अनेक नवीन गोष्टी, समस्या सुद्धा निर्माण होत आहेतच.

यात भरीस भर म्हणुन मुलांच्या शाळा पण ऑनलाइन सुरु आहेत. घरातल्या मोठ्या व्यक्तींसारखाच मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल किंवा तत्सम डिजिटल उपकरणांचा वापर वाढला आहे. ऑनलाइन शाळेचे वर्ग सुरु असतांना मुलं आपोआप युट्युब किंवा इतर वेबसाइट्सवर वळतात हे चित्र आपण आज घराघरात पाहू शकतो.

डिजिटल उपकरणांचा अतिवापर झोपेपासून आपल्या सर्जनशीलतेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये व्यत्यय आणू शकतात येऊ आता तर संशोधनात सुद्धा आढळून येत आहे.

दर काही मिनिटांनी फोन तपासणी करणं, येणार प्रत्येक नोटिफिकेशन आपल्यासाठी असेल असं समजून तपासात राहणं आणि फोनला डेटा, चार्जिंग नसेल किंवा तो नजरेसमोर नसेल तर त्यासाठी जीव कासावीस होणं खरंच साधारण नाही – हि समस्या आरोग्याच्या दृष्टीने औपचारिकपणे एक विकार म्हणून ओळखले जात नाही पण मानसोपचारतज्ज्ञ याला नकारात्मक मानसिक प्रभाव मानतात.

स्क्रीन टाइम प्रॉब्लेम SCREEN TIME PROBLEM
स्क्रीन टाइम प्रॉब्लेम (SCREEN TIME PROBLEM)
  • जास्त वेळ कुठल्याही स्क्रीनकडे पाहिल्यामुळं आपण आपल्या डोळ्यांमधे कोरडेपणा, डोळ्यांवरती ताण, तीव्र प्रकाशामुळं अंधुक दृष्टी आणि सतत चुकीच्या आसनामुळे मान आणि खांदे यांचं दुखणं
  • डिजिटल उपकरणांमधला निळा प्रकाश झोपेला प्रोत्साहन देणारा हार्मोन मेलाटोनिन दाबून टाकतो, ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही.
  • समोरासमोर संवादाचा अभाव
  • व्यक्तींमध्ये असलेला भिडस्तपणा कमी होतोय. अनोळखी माणसांची बोलणं, नवीन मित्र बनवणं यासर्वांपेक्षा या गोष्टी ऑनलाइन करण लोकांना अधिक सोपं आणि आरामदायी वाटू लागलय

आपल्यासारख्या ९०च्या दशकात जन्माला आलेल्या व्यक्तीच आयुष्य लहानपणी खुप वेगळ होतं. आपल्याला करायला बऱ्याच गोष्टी होत्या. मोकळ्या पटांगणात खेळणं, मित्रांच्या घोळक्यात रमून राहणं आजच्या तुलनेत बरच सोपं होत. या काळात मोबाईक नव्हते म्हणुन आपल्याला असं जगावं लागलं असा एक युक्तिवाद केला जाऊ शकतो पण त्याजागण्यात सुद्धा एक प्रकारची मौज होती. आज आपल्याला डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत पण तो काळ जगलेल्याना आवश्यकतेपलीकडे वापराव्यतिरिक्त या गोष्टीचं फारसं अप्रूप नाही.

वर सांगितलेल्या काही समस्यांव्यतिरिक्त घरोघरी कमी होत असलेला संवाद सुद्धा एक परिवार म्हणून चिंतेचा विषय आहे. आधी सामानाची यादी बसून तयार केली जात असे आज आपण पुढे जातो आणि सामानाची यादी मागून व्हाट्सअप केली जाते.

छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवता येणार आनंद आपण आभासी जगात शोधतोय. सोशल मीडियावर जोडलेले शेकडो मित्र ज्यांना आपण कधी भेटलेलो सुद्धा नाही उद्या समाज कुणी समोर आलेत तर ओळखताना सुद्धा पंचाईत होते.

या आभासी जगापासुन थोडं दूर रहाणं फार गरजेचं आहे. मानवी मनाच्या आरोग्यासाठी, सकारात्मक मन जोपासण्यासाठी लोकांमध्ये मिसळणं, संवाद साधणं, पुस्तकांचं वाचन या थोड्या जुन्या गोष्टी वाटल्यातरी आवश्यक आहेत. जितकी जास्त हालचाल करता येईल तितकी करणं खरं तर ठरवून जास्त हालचाल, व्यायाम करणं हि तर न टाळता येण्याइतकी आणि रोजच्या दिनक्रमाचा भाग असण्याची गरज आहे. जेणेकरून वाढलेल्या वजनानंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या कदाचित टाळता येऊ शकतील.

डिजिटल डिटॉक्स या समस्येवर एक उपाय आहे.

या सर्व समस्यांपासून तुम्ही स्वतःला कसं दूर ठेवता, डिजिटल डिटॉक्सची तुम्ही पद्धती काय हे आम्हाला टिप्पण्यांमध्ये नक्की कळवा याचा वाचकांना नक्की फायदा होईल.

आभासी नसलेलं एका खरंखुरं सुंदर आयुष्याचा आस्वाद घेऊयात.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.

3 comments
Leave a Reply

Your email address will not be published.

Related Posts
weight loss soup औषधी वनस्पती आणि सुपरफूड – मेथी खाण्याचे फायदे Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee