कोरोनानें आपल्याला काय शिकवलं? (6 Life Lessons From Corona)
जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि ते अपेक्षित आहेतच. जर जीवनातं सगळं काही छान सुरु असेल, काही संकट नाही,समस्या नाहीत, कश्यासाठी स्पर्धा नाही – तर आपलं जीवन निरस होऊन जाईल. पण जीवनात कधी कधी अश्या परिस्थिती येतात ज्या आपल्याला आयुष्यभरासाठी काहीतरी शिकवुन जातात त्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला देतात – आणि अश्या बहुतेक वेळा या अकस्मात येत असतील तर काही काळासाठी आपण खचितच गोंधळून जातो. जमेल तसें समोर असलेल्या परिस्थितीला सामोरे जातो आणि त्यांतून बाहेर पडत आलंच तर यापासून योग्य धडा घेतो आणि भविष्यात अशी परिथिती पुनः आलीच तर त्यासाठी तयार राहण्याची एक संधी आपल्याला मिळते.
आता हे सर्व सांगण्याचं प्रयोजन म्हणजे कोरोना.
गेल्या २ वर्षांपासून आपल्या जीवनांत कितीतरी बदल घडलेत ते अकस्मात उपटलेल्या या कोरोना संकटाने. शाळा, ऑफिस, व्यवसाय,इतकच काय आपल्या रोजच्या आवडी-निवडी, सवयी सर्वच काही बदलले आहेत. कोरोनामुले आपल्या जीवनात कितीतरी उलथापालथ केली आणि जसं वर सांगितले तसेच आयुष्यभर पुरतील असे काही धडे पण आपल्याला दिलेत.
चला तर बघूया – अकस्मात उद्भवलेल्या ग्लोबल महामारीसारख्या परिस्थितीनं आपल्याला कुठले जीवनावश्यक धडे दिलेत.
आपत्कालीन निधीची आवश्यकता | A need to have emergency fund
आपत्कालीन निधी किंवा इमरजेंसी फंड एक अशी आर्थिक तरतूद असते ज्यात तुम्ही अचानकपणें आलेल्या संकटाची राहिक पैश्याची सोया करून ठेवतात.
जस आपण बघितलंच आहे ज्यांना कुणाला कोरोना लागण झाली त्यांनी जर आधीच आरोग्य विमा केला असेल तर त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, पण ज्यांनी अशी कुठली सोय केलेली नव्हती त्यांना आपल्या शिल्लक सेविंगमधून या आजारपणाचा सर्व खर्च करावा लागला आणि वर्षानुवर्षं केली सेविंग थोडक्यात संपून गेली.
असे येणारे आजारपणं, नोकरी सुटणे किंवा व्यवसायात होणार नुकसान परिस्तिथी काहीही असू शकेल पण तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी इमरजेंसी फंड बनवणे अतिआवश्यक आहे.
पर्सनल फायनान्सचा विचार करता तुमच्या एक महिन्याच्या खर्चाच्या कमीत कमी ६ ते ८ पण रक्कम तुम्ही आपत्कालीन निधी किंवा इमरजेंसी फंडामध्ये शिल्लक टाकायला हवी (You should have emergency fund equal to 6 times your todays monthly expenses). जेणेकरून तितका वेळ तुम्ही कमी किंवा विनाउत्पन्न सुद्धा आजची तुमची लाईफस्टाईल सुरु ठेऊ शकता.
आरोग्यम धनसंपदा | Health is Wealth is the Mantra
आपल्या मराठीमध्ये एक उक्ती आहे – आरोग्यम धनसंपदा, याबद्दल अधिक सांगायची विशेष गरज आहे का?
आपल्या जीवनात अश्या फारच थोड्या गोष्टी आहेत ज्या पैश्यानं विकत घेता येत नाहीत, जबरदस्ती मिळवता येत नाही आणि एकदा हातून निसटून गेल्यात तर परत हाती येत नाही आणि त्यांपैकीच “आरोग्य” हे सर्वात महत्वाचं.
फार पैसे मिळवला पण आरोग्य नसेल तर काय फायदा. खूप यश मिळवल पण रात्री शांत झोप येत नसेल तर काय फायदा त्या यशाचा?
तेव्हा आरोग्य प्रत्येकानं सांभाळलचं पाहिजे. योग्य आहार, योग्य व्यायाम, शांत झोप, आणि आजच्या जमान्यात तर डिजिटल डिटॉक्स सुद्धा अश्या चांगल्या सवयीचा अंतर्भाव आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलाच हवा.
नवनवीन स्किल्स आत्मसात करा | Learn New Skills
कोरोना काळादरम्यान अनेकांना आपल्या नोकरी व्यवसाय गमवावे लागले. काही लोकांच्या बाबतींत मात्र वर्षांनुवर्षे आत्मसात केलेलं कौशल्य अचानक कुचकामी ठरलं. हाताला काम नाही, घराबाहेर पडत येत नाही अश्या दुहेरी संकटात कितीतरी लोक सापडलेत. मोबाईलच्या अचानक वाढलेल्या वापरामुळे बरीच अर्धवट माहिती हाती आलेलीआणि अश्या थोड्या आणि अपुऱ्या माहितीतून अनेकांनी शेअर बाजारात सुद्धा बऱ्यापैकी नुकसान सहन केलं.
याव्यतिरिक्त एका पेक्षा अधिक आणि वेगळी कौशल्य असणारी कितीतरी लोक हे नाहीतर दुसरं काम करून आपल्या जीवनावश्यक गरजा थोड्या किंवा बऱ्या प्रमाणात भागवू शकलेत.
अश्या परिस्थितीसोबत निपटण्यासाठी आपण वेगवेगळी कौशल्य जी गरज पडल्यास पैसे मिळवण्यासाठी कमी येतील ती आत्मसात करायलाच हवीत. आज YouTube वर किंवा Udemy वर अगदी थोड्या पैश्यात professional skills शिकू शकता. दरमहा थोडी रक्कम बाजूला काढुन यावर पैसे खर्च करणं काही मोठी जोखीम नक्की नाही.
नवनवीन संधी शोधत रहा | Keep looking new opportunities
डोळे उघडे ठेवलेत तर आपण अनेक संधी पाहू शकतो. कोरोना काळात हेच कित्यकांनी सिद्ध करून दाखवलं. साधं उदाहरण म्हणजे वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन शाळा. सर्व काही थांबलेले असतांना मोठमोठी आस्थापने आपली रोजची काम विनासायास करत होती. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून शाळा सुरु ठेवता आल्यात. अनेकांनी घरबसल्या डिजिटल बिजनेस, ट्युशन्स असत्या कितीतरी संधी शोधल्या, त्यांत व्यवसायाची शकता पहिली आणि सेट सुद्धा झालेत.
परिस्थिती आपल्याला अनुकूल असेल किंवा नसेल पण डोळे उघडे ठेऊन केलेली तीच आकलन आपल्याला नक्कीच काहीतरी दिशा दाखवु शकते. शेअरबाजारात एक म्हण प्रचलित आहे – “मंदीत संधी असते (गुंतवणुकीसाठी)” हेच तत्व इथं सुद्धा लागू होत – गरज आहे फक्त डोळसपणाने ती संधी हेरण्याची.
एकापेक्षा अधिक अर्थार्जनाचे स्रोत बनवा | Create more that one income stream
आधी सांगितल्याप्रमाणे जी लोक फक्त एकाच नोकरी किंवा व्यवसायावर अवलंबून होती आणि त्यांना त्यापासून मुकावं लागलें त्यांना कमाई होत असल्यानं किती त्रास झाला याची कितीतरी उदाहरणं आपण पाहिलीत. मग, यातून एक सोपा बोध काय मिळतो तर फक्त एकाच उत्पन्नाच्या स्रोताव तुमची मदार असेल तर ये योग्य नाही.
पैसा कमावण्यासाठी तुम्ही नवनवीन संधी, एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण करायलाच हवेत. याचा उपयोग फक्त श्रीमंत होण्यासाठीच नाहीतर कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्पन्न आटणार नाही याची काळजी घेण्यासाठी करायला हवा.
प्रत्येक छोट्या/मोठ्या प्रवासाची सुरवात हि पहिल्या पावलाने होतें हे लक्षात ठेवा आणि सुरवात करा. तुम्हाला अगदीच काही वेगळे करायचं नाही – जी तुमची कौशल्य आहेत, छंद आहेत त्यांनाच थोडं व्यावहारिक रूप देऊन तुम्ही सुरवात करू शकता.
बचत आणि गुंतवणुक योग्य ठिकाणी करा | Save & Invest Carefully
अर्थसाक्षर व्हा. बचत आणि गुंतवणुक या दोन्ही फार भिन्न गोष्टी आहेत पण अनेक सुशिक्षित लोक सुद्धा यात गोंधळून जातात. दरमहा तुम्ही चांगला पैसा बचत करत असाल पण तो जर योग्य ठिकाणी गुंतवू शकाल नाहीत तर वाढत्या महागाईसोबत त्याचं चलन मूल्य कमी होईल.
योग्य ठिकाणी आणि नियोजित उद्देशांसाठी गुंतवलेला पैसे महागाईच्या मानानं तुम्हांला योग्य परतावा तर दिलाच पण त्यावेळेला तुम्हला आवश्यक असणारी रक्कम सुद्धा हाती देईल.
उदाहरण म्हणजे, कुठली एल.आय.सी. काढून ५- ७% परतावा जो महागाईच्या दरापेक्षा कमी ठरतो आणि तुटपुंजे लाइफ इन्शुरन्स मिळवण्यापेक्षा, योग्य टर्म प्लॅन आणि चक्रवाढ पद्धतीने परतावा देणारे म्युच्युअल फंड, पी.पी.एफ., सुकन्या समृद्धी योजना हे पर्याय तुम्हांला गुंतवणुकीसाठी योग्य ठरतात – आणि यासाठी थोडं अर्थसाक्षर होण्याची गरज आहे.
याशिवाय आपल्या नि परिवारासाठी हेल्थ इन्शुरन्स सुद्धा काळाची गरज आहे – त्याकडं दुर्लक्ष केलात तर वाढते आरोग्यविषयक खर्च तुमच्या आवाक्याबाहेर राहतील.
mast lihilay.
agdi barrobar aahe sgl.
pryatyek goshtimage kahitri shikayla milt aapli najr positive hvi